जिल्ह्यातील ३३ इंग्रजी माध्यमांच्या शाळा शुल्क वाढीच्या कचाट्यात

27

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.6ऑगस्ट):-राज्य सरकार एकीकडे कोरोनाच्या काळात शाळांनी शुल्कवाढ करू नये, असे आदेश काढत असताना दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई, सीआयएससीई, आयबी, आयजीसीएसई आणि सीआयई आदी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांना राज्यात परवानगीसाठी लागणार्‍या शुल्कामध्ये प्रचंड वाढ केली असल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट आता चालवायच्या कशा असा प्रश्न शिक्षण संस्था चालकांना पडला आहे. यापूर्वी एनओसी शुल्क २0 हजार रूपयापयर्ंत होते ते आता थेट अडीच लाख रुपए करण्यात आले. तर नाहरकत प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी १0 हजार असलेले शुल्क वाढवून दीड लाख रुपये करण्यात आले. राज्य सरकारने कोरोनाच्या काळात काढलेल्या या नव्या अध्यादेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ३३ इंग्रजी माध्यमांच्या शाळा अडचणीत आल्या असून राज्यभरात जवळपास ७४0 शाळा सरकारच्या या जाचक शुल्कवाढीच्या कचाट्यात सापडल्या आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव इ.मु.काझी यांनी २0 जुलैला हा आदेश काढला आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी वाढीव शुल्क आकारू नये असे अनेक आदेश शैक्षणिक संस्थांसाठी जाहीर केले.