एक झाड एक व्यक्ती अभियाना अंतर्गत डॉ.आत्मारामजी टेंगसे सर यांचा एक झाडाचे रोपटे देऊन वाढदिवस साजरा.

    48

    अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
    गंगाखेड :- गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉ.प्रा.आत्माराम टेंगसे यांच्या 75 व्या वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव वर्षानिमित्त अभियानाशी सुसंगत चर्चा करून “एक झाड रोप वाटिका “देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
    या वर्षी उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे आबाल/वृद्धांना जो त्रास झाला त्याचे मुख्य कारण म्हणजे होत असलेले वृक्षतोड झाडांची कमी होत असलेली संख्या त्याच अनुषंगाने दिव्यांग फाउंडेशन कांदलगाव यांनी “एक झाड एक व्यक्ती “या अभियानास सुरुवात केलेली आहे याचाच एक भाग म्हणून गंगाखेड तालुका व परभणी जिल्ह्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. आत्माराम जी टेंगसे सर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने त्यांना एक झाडाचे रोपटे देऊन शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी अभियानाचे संयोजक अड.उत्तम काळे,संतोष कलिंदर याप्रसंगी इतर सहकारी उपस्थित होते.