परमपूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांचा अठरावा पुण्यतिथी महोत्सव -19 जून रोज बुधवारला तिथीनुसार पुण्यतिथी

    331

    रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
    ब्रम्हपुरी:- ज्येष्ठ शुद्ध द्वादश दिनांक 19 जून 2024 रोज बुधवार ला सत्संग भवन श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
    येथे मागील तीन वर्षापासून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी अंतर्गत श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ समिती अड्याळ टेकडीच्या वतीने निष्काम कर्मयोगी, समाधिस्थ परमपूज्य तुकारामजी दादा गीताचार्य यांचा तिथीनुसार पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
    यावर्षी सुद्धा अठरावा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असून उत्सवात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणजी गमे, सरचिटणीस श्री जनार्दनपंत बोथे, उप सर्वाधिकारी श्री दामोदर पाटील, प्रचार विभाग प्रमुख प्रकाशजी वाघ, ऍड.दत्ता हजारे चंद्रपूर जील्हा सेवाधिकारी रूपराव कावळे चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख प्रा. अशोक चरडे चंद्रपूर जिल्हा सेवाधीकारी दादाजी नंदनवार चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख विटटलराव सावरकर प्रांत सेवाधीकारी चंद्रपूर जिल्ह्याचे माजी जिल्हा कृषी अधीक्षक श्री भाऊसाहेब बऱ्हाटे, श्रीमती ताराबाई गाडेकर सरपंच ग्रामपंचायत अड्याळ टेकडी, श्री नामदेवराव लांजेवार उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य गण अड्याळ (जानी) ह भ प नाना महाराज, ह भ प गवते महाराज, ह भ प देवराव भुरे महाराज, श्री तुंडलवार गुरुजी श्री विठ्ठलराव पंचभाई येनोडा, श्री सयाम गुरुजी, श्री भुते गुरुजी उमरी, श्री विलासराव सावरकर तसेच अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यास व संत स्वरूप पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता पुण्यतिथी उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रातःस्मरण सकाळी 4:30 वाजता.
    सामुदायिक ध्यान सकाळी 5:00 वाजता.
    योग प्राणायाम सकाळी 6:00 वाजता.
    रामधुन सकाळी 7:00 वाजता
    श्रमदान सकाळी 8:00 वाजता.
    ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रचार प्रसार कार्यावर चर्चासत्र सकाळी 10:00 वाजता.
    सत्संग सकाळी 11:30 वाजता.
    महिला कार्यकर्त्यांचे संमेलन दुपारी 3:00 वाजता.
    सामुदायिक प्रार्थना व श्रद्धांजली सायंकाळी 6:00 वाजता. राष्ट्रवंदना रात्री 10:00 वाजता. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी अंतर्गत श्री गुरुदेव आत्मा अनुसंधान भू वैकुंठ समिती अड्याळ टेकडी येथे तिथी प्रमाणे अठरावा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.