भगवान बुद्धांची नितीतत्वे मानवी कल्याणार्थ : पूज्य भदंत दिपंकर महाथेरो

  47

  जळगाव :- भगवान गौतम यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सारनाथ येथे बौद्ध धर्माची स्थापना करून त्याच्या प्रचार प्रसारार्थ भिख्खू संघ निर्माण केला त्या माध्यमातून जी नितीतत्वे प्रस्थापित केली ती समस्त मानवाच्या कल्याणार्थ आहेत असे विचार पूज्य भदंत दिपंकर
  महाथेरो ( मुंबई ) यांनी व्यक्त केले .
  अजिंठा हाउसिंग सोसायटी, जळगाव येथे दिनांक १ जून ते १० जून श्रामणेर शिबिर भारतीय बौद्ध महासभा, जळगाव तर्फे आयोजित करण्यात आले असता आजच्या समारोपीय समारंभात पूज्य भदंत दिपंकर महाथेरो यांचे मुख्य धम्म प्रवचन आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात विविध विषयांवर विविध मान्यवरांची भाषणे झाली . श्रामणेर यांचे कडून विविध पूजाविधी पाठांतर करवून घेण्यात आली . सर्व श्रामणेर अतिशय श्रद्धेने यात सहभागी झाली व यापुढ बौद्ध धर्माची सर्व पूजाविधी आम्ही करत राहू असे त्यांनी बोलून दाखविले .
  ज्येष्ठ साहत्यिक जयसिंग वाघ यांनी श्रामणेर शिबिरांचे महत्व , बुद्धकालीन समाजव्यवस्था, भिख्खू संघाचे योगदान तसेच बौद्ध धर्माच्या विविध पैलूंवर विचार मांडून आज जगभरात बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचे सांगितले .
  या प्रसंगी सहभागी सर्व २४ श्रामणेरांनी आपले अनुभव मांडून या पुढं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्धार बोलून दाखविला . बहुतांश श्रामणेर ग्रामीण भागातून आलेले होते त्यांनी ग्रामीण भागातील अंधश्रद्धा तसेच बुद्ध विरोधी आचरण कथन करून ग्रामीण भागात बुद्ध विचार रुजविणे गरजेचे आहे असेही सांगितले .
  भा. बौद्ध महासभेचे राज्य प्रमुख के . वाय . सुरवाडे यांच्या मुख्य मार्गदर्शना खाली हे शिबिर संपन्न झाले . त्यांनी शिबिराच्या माध्यमातून बौध्द जनतेत मोठ्या प्रमाणात बदल घडून येतात या बद्दलची काही उदाहरणे दिली . या प्रसंगी युवराज नरवाडे , प्रा. प्रितलाल पवार , बी. के. बोदोडे , प्रा. संजय साळवे , सुनील अडांगळे , सुशीलकुमार हिवाळे , रवींद्र वानखेडे आदी बौद्धाचार्य यांनी आपले विचार व्यक्त केले .
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश इंगळे , प्रास्ताविक प्रकाश सरदार , स्वागत शैलेंद्र जाधव , सुकदेव इंगळे , दिलीप डोंगरे यांनी , परिचय बी. एस. पवार , सचिन तायडे यांनी तर आभारप्रदर्शन सुभाष सपकाळे यांनी केले .
  शिबिराच्या यशस्वीेते करिता विमल भालेराव , कविता सपकाळे , सुमन बैसाणे , दिलीप सपकाळे , दिलीप तासखेडकर , सुनील बिऱ्हाडे , अशोक सैंदाणे यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमास जिल्हाभरातून बौद्ध उपासक , उपासिका मोठ्या संख्येने हजर होते .
  सुरवातीस भगवान गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे भंते दिपंकर महाथेरो यांनी पूजन करून बुद्ध वंदना घेतली. शेवटी आशीर्वाद गाथा घेण्यात आली.