सातारा,खटाव, प्रतिनि/ नितीन राजे 9822800812
पुणे (मंचर,) नंतर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव ची ओळख बटाटा उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाऊ लागली. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दुष्काळाचा कलंक पुसल्याने पुसेगाव मधील बाजारपेठ बटाटे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गजबजून गेली.
पुसेगाव पंचक्रोशीतील भाग बटाटा उत्पादनासाठी पहिल्यापासूनच अग्रेसर आहे परंतु मागील काही वर्षांमध्ये बटाट्याला पर्यायी पिकांचा समावेश झाल्याने काही प्रमाणात बटाट्याची उत्पादन घटले परंतु आता योग्य वेळेला पाऊस झाल्याने पुसेगाव बाजारपेठेत बटाटे बियाणे दाखल झाली असून शेतकरी वर्ग देखील बटाटे खरेदी करण्यासाठी उत्साहाने पुढे येऊ लागला आहे.
खाण्यासाठी बटाटे आणि वेफर्स साठी बटाटे त्यात फरक असून वेफर्स बनणाऱ्या बटाट्या च्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांचा कल दोन्ही बियानाकडे दिसत असून होती २५००ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दर असल्याची माहिती बालाजी ट्रेडिंग कंपनी पुसेगाव चे धनराज सावंत यांनी दिली.