_पवन ऊर्जेच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १५ जून रोजी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. पवन दिवस आपली शक्ती आणि जगभरातील ऊर्जा प्रणालींना पुन्हा आकार देण्याची क्षमता समोर आणतो. या स्थितीत पाणी, वारा इत्यादी नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. सदर सुंदर ज्ञानवर्धक माहितीचा संकलित लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी प्रस्तुत केलाय… संपादक._
१५ जून हा दिवस जगभरात जागतिक वायू दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाला अपारंपरिक ऊर्जा म्हणून पवन ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. मानवी संस्कृतीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा हळूहळू ऱ्हास होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान झपाट्याने बदलत आहे ज्यामुळे मानवी सभ्यता नष्ट होते असे मानले जाते. पवन ऊर्जेच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १५ जून रोजी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. पवन दिवस आपली शक्ती आणि जगभरातील ऊर्जा प्रणालींना पुनर्आकार देण्याची क्षमता समोर आणतो. या स्थितीत पाणी, वारा इत्यादी नैसर्गिक अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. निसर्गाचा नाश करण्याऐवजी त्याच्या विविध शक्तींचा वापर कसा करता येईल याकडे विज्ञानाची वाटचाल सुरू आहे. वाऱ्याच्या शक्तीबद्दल आणि त्याचा वापर कसा करता येईल याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. इतकेच नाही तर या अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे फायदे आणि आतापर्यंत या ऊर्जेचा वापर कसा करायचा याचेही निरीक्षण या दिवसात केले जाते. सन २००७मध्ये पहिल्यांदा हवा दिन- विंड डे १५ जून रोजी साजरा करण्यात आला. पण तेव्हा तो फक्त वाऱ्याचा दिवस होता. दोन वर्षांनंतर सन २००९मध्ये सद्याचे नाव देण्यात आले. तेव्हा विंड युरोप आणि ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिलने भागीदारी केली आणि त्याला जागतिक पवन दिवस असे नाव दिले. पवन ऊर्जा म्हणजे काय? तर हवा ही गतिमान आणि ऊर्जेचा एक प्रकार आहे. हे आपल्या वातावरणातील हवेच्या दाबातील फरकामुळे होते. उच्च दाबाखालील हवा कमी दाबाच्या क्षेत्राकडे जाते. दाबाचा फरक जितका जास्त असेल तितक्या वेगाने हवा वाहते.
सदर जागतिक वायू दिन प्रत्येक वर्षी न चुकता साजरा केला जातो. हा दिवस पवन ऊर्जेचे महत्व समजणे आणि त्याच्या क्षमतेविषयी जागरुकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्व सदस्यदेश दरवर्षी हा दिवस साजरा करतात. या दिवसाचे आयोजन करताना शाश्वत पर्यायी उर्जेचा विचार केला जातो. या वर्षी म्हणजेच २०२४मध्ये १७वा जागतिक पवन दिवस साजरा केला जात आहे. हवा एक शक्तीशाली नैसर्गिक संसाधन आहे. ज्यातून ऊर्जा निर्मिती होऊ शकते. हे लक्षात घेऊन जागतिक वायू दिनी संयुक्त राष्ट्रसंघांचे सर्व सदस्य देश पवन उर्जेचा उत्सव साजरा करतात. त्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात. युरोपियन पवन ऊर्जा संघाने सन २००७मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता. काही काळाने ग्लोबल विंड एनर्जी काउंसिलच्या मदतीने हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर सन २००९मध्ये या दिवसाला वैश्विक स्तरावर साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवसाचा हेतू हा स्वच्छ हवेचे महत्व जगाला पटवून देणे हा आहे. शिवाय वातावरणात असलेला भरपूर प्रमाणातला कार्बन याविषयी जागरुकता यानिमित्ताने केली जाते. बरेच लोक या दिवशी किनाऱ्यावरील आणि ऑफशोअर विंड फार्मला देखील भेट देतात. या दिवशी लोक मोहिमेत सामील होतात, तसेच पवन ऊर्जेसंबंधी सर्व प्रकारची माहिती मिळवतात. या दिवसानिमित्त अनेक शहरांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जेणेकरून लोकांना हवेसारख्या शक्तिशाली नैसर्गिक स्त्रोताचे महत्त्व समजावे. यानिमित्त अनेक शहरांमध्ये पवन परेडचे आयोजनही केले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे भारतालाही अक्षय ऊर्जेचे महत्त्व समजले आहे. पवन ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे, ज्यामध्ये तामिळनाडूचा वाटा सर्वाधिक आहे. भारतातील पवन ऊर्जा प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता ४० गीगा वॅटच्या जवळपास आहे.
आज जगभरात जागतिक पवन दिवस साजरा केला जात आहे. याला जागतिक पवन दिवस किंवा वर्ल्ड विंड डे असेही म्हणतात. हा जगभरातील कार्यक्रम आहे, जो दरवर्षी १५ जून रोजी होतो. पवनऊर्जा आणि त्याचा उपयोग याबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पवन ऊर्जेचे महत्त्व आणि ते जग कसे सुधारू शकते यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हवेशिवाय जीवन कसे असेल याचा विचार करणेही अशक्य वाटते. हवा असेल तर जीवन आहे. आजही जगभरातील शास्त्रज्ञ इतर अनेक ग्रहांवर हवा शोधत आहेत. जागतिक पवन दिनानिमित्त ७५हून अधिक देशांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पवन दिवसाचा इतिहास ग्लोबल विंड डेचे आयोजन युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन आणि ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल आणि राष्ट्रीय संघटनांद्वारे केले जाते. या दिवसाची स्थापना सामान्य लोकांना पवन ऊर्जा आणि त्याचे फायदे जाणून घेण्यासाठी करण्यात आली. सन २००९पर्यंत जागतिक पवन दिवस किंवा ग्लोबल विंड डे नव्हता. त्यानंतर हा दिवस अधिक सर्वसमावेशक बनला आणि लोकांपर्यंत पोहोचवला गेला आहे. पण आज जगावर घोंगावतय वेगळच संकट! अटलांटिक प्रवाहावरील संशोधनातून धक्कादायक माहिती मिळाली आहे, आपण अशा काळात जगत आहोत, जिथे जगभरात ग्लोबल वार्मिंगचा धोका आहे. अशा परिस्थितीत पवन ऊर्जेसारख्या उर्जेचा कार्यक्षमतेने वापर करणे महत्त्वाचे ठरते. पवन ऊर्जा सध्या एक परिपक्व आणि मुख्य प्रवाहातील तंत्रज्ञान आहे. सन २०१५मध्ये १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीसह हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. एकट्या इयूमध्ये पवन उद्योगाने गेल्या वर्षभरात गॅस आणि कोळसा यांच्या तुलनेत जास्त क्षेत्र व्यापलं आहे. हे क्षेत्राच्या १५ टक्के विजेच्या वापराची पूर्तता करण्यासाठी पुरेशा संचयी स्थापित क्षमतेसह केले जाते, जे ८७ दशलक्ष घरांना वीज पुरवण्याइतके आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे, अधिकाधिक लोकांना पवनऊर्जेची माहिती व्हावी. भारतात वाढणारी लोकसंख्या पाहता भविष्यात मोठ्या प्रमाणात उर्जेची गरज भासणार आहे. देशानेही पवन उर्जेचे महत्व ओळखलं आहे. भारत पवन उर्जेच्या बाबती जगात चौथ्या क्रमांकावर आहे. ज्यात सर्वाधिक योगदान तमिळनाडू राज्याचे आहे. देशातील पवन उर्जेच्या माध्यमातून ४० गीगा वॅट उर्जेचे उत्पादन केले जाते. हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्याविरोधात कृती करण्यासाठी जगभरात आज प्रथमच जागतिक निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा- क्लीन एअर फॉर ब्लू स्काय दिन साजरा केला गेला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र- यूएनच्या महासभेत झालेल्या ठरावाचा एक भाग म्हणून आजचा दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला. फुफ्फुसाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरणारी प्रदूषित हवा पर्यावरणाचीही कायमस्वरुपी हानी करत असल्याने त्याकडे अधिक दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल, असे संयुक्त राष्ट्रांनी आज म्हटले आहे. हवा प्रदूषणाचे धोके सर्वांसमोर प्रकर्षाने समोर यावेत आणि सर्व देशांनी हा धोका कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, हा हेतू समोर ठेवून दरवर्षी सात सप्टेंबर दिवस जागतिक निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आज संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी सर्व देशांशी संवाद साधताना शाश्वत विकासासाठी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व देशांना केले. शाश्वत विकास परिषदेत बहुतांशी देशांनी चांगल्या भविष्यासाठी शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे देशांना आवाहन केले आहे- तापमानवाढीवर नियंत्रण ठेवा, प्रदूषण कमी करण्यासाठी योजना आखा. जैविक इंधनावरील अनुदान बंद करा. स्वच्छ ऊर्जेच्या वापरावर भर द्या. पर्यावरण बचावासाठी जागतिक पातळीवर सहकार्य वाढवा. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साजरा करण्याला अधिक महत्त्व आले आहे. व्यक्तिगत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्वत विकासाकडे वाटचाल करतानाच हवाप्रदूषणाकडे आणि त्यापासून असलेल्या धोक्यांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
!! आंतरराष्ट्रीय वायू दिनाच्या समस्त मानवमात्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त दूरभाष- 7132796683.