नागरिकांनी आपत्ती काळात घरातच सुरक्षित रहावे-ना.वडेट्टीवार यांचे आवाहन

    40

    ✒️मुंबई/चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.६ ऑगस्ट)-मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार, मंत्री, आपत्ती व्यवस्थापन यांनी दि.ऑगस्ट रोजी रात्रौ ८:३० वाजता मुंबईत मंत्रालय नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील तसेच मुंबई तील वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस, पूर, झाडे पडलेल्या घटनांचा आढावा घेतला. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पुर परिस्थितीची माहिती घेतली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.