अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरी विचारला प्रेरणा मानले-समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

14

✒️चिमूर (पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क)

चिमुर(दि.6ऑगस्ट):-डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशा तील सामजिक विषमतेच्या विरोधात बंड पुकारले स्वतंत्र ,समता, न्याय, व बंधुभाव या मूल्यावर आधारलेले ह्या आंबेडकरी विचारांचे अण्णा भाऊ साठे च्या मनात नितांत आदर होता त्यामुळे त्यांनी आपली फकिरा ही कादंबरी बाबासाहेब यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली जरी अण्णा भाऊ साठे च्या जीवनाची सुरवात ही मार्क्सवादी विचारांनी झाली असेल तरी त्यांच्या प्रतिभा वंत कृति ह्या डोळस बघणे हे फार महत्वाचे आहे बुद्ध ,फुले,आंबेडकर यांचाही वारसा त्यांनी जपला व आंबेडकरी विचारानी त्यांचे आयुष्य सम्प्ले ही त्यांची सम्यक भूमिका लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे आजच्या या आण्णा भाऊ साठे च्या शताब्दी महोत्सवानिमित्त अश्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी विचार व्यक्त केले.

त्या नेरी येथील साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक समिती नेरी येथे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष स्थानी नेरी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना जिल्हा वीभाग प्रमुख व मातंग समाजाचे संगठक किशोर उकुंडे होते.त्यांनी आपल्या अद्यक्षीय भाषणात बोलताना समाजाची व्यथा व खंत मांडतात म्हणाले की मातंग समाजाच्या संघटना खुप आहेत पण काही संघटना समाजाची दिशा भूल करत आहेत योग्य मार्गदर्शन समाजा ला करत नाहीत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देत नाहीत जाती जाती त द्वेष निर्माण करत आहेत तर या लोकडवून च्या काळात समाजातील हाताचे काम गेले पण तिथे त्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही व राजकारनात लक्ष देण्यास वेळ आहे साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे ना ही च खरी आदरांजली होईल की भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देणे व त्यांचा विकास साधने असे समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी सांगितले.

पिपळाचे चे वृक्ष देऊन वृक्ष रोपण केले या कार्यक्रमात उपस्थित देवानंद बावणे, अशोक बावणे,शंकर उकुंडे, सुदर्शन बावणे,संदिप बावणे,सुनील मुंगले,मनीषा उकुंडे, ग्रामपंचायत सदस्य देवकाबाई शेंडे, संजय डोंगरे,प्रेमीला उकुंडे, कुसुम उकुंडे आदी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशिष उकुंडे यांनी मानले कार्यक्रम फिजिकल डिस्टन्स ठेवून व नियमांचे पालन करून घेण्यात आला.