पुसेगाव कार्यक्षेत्रात “एक गाव – एक गणपती” संकल्पना राबवणार- स.पो.नि. विश्वनाथ घोडके

31

✒️नितीन राजे(विशेष प्रतिनिधी,खटाव)जिल्हा, सातारा

मो:-9822800812

खटाव(दि.6ऑगस्ट):-जागतिक महामारी करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र उपायोजना चालू असून प्रत्येक विभाग आपापल्यापरीने पूर्ण क्षमतेने काम करत आहे. मार्चपासून सुरु झालेली टाळेबंदी मध्ये आलेले सण-उत्सव या सर्व कार्यक्रमांना शासकीय नियमाप्रमाणे सर्वांनीच सहकार्य केले. आता गणेशोत्सव काळात ग्रामीण भागातील कोरणा बाधित यांची संख्या वाढत असून, या महामारिला अटकाव करण्यासाठी पुसेगाव कार्यक्षेत्रातील येणाऱ्या सर्व गावातील मंडळांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना साकारून एक सहकार्य करतील अशी भावना पुसेगाव पोलिस स्टेशनचे सपोनि विश्वनाथ घोडके यांनी व्यक्त केली.
खटाव मध्ये करुणा विषाणू बाधित यांची संख्या वाढत आहे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दक्षता कमिटीचे अध्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रांची डॉक्टर व गावातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थ राजकीय पुढारी यांच्याकडून आलेल्या सूचनांमध्ये ,एक गाव एक गणपती ही संकल्पना खटाव मध्ये राबविण्यात यावे असे सूचित करण्यात आले. श्री घोडके यांनी माझ्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रभावीपणे राबवता येईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी सर्वांनीच या संकल्पनेचे स्वागत केले.व ही संकल्पना सर्वत्र लागू व्हावी अशी मागणीच आता जनतेतून होत आहे.