
🔺कोरोनाच्या काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.6ऑगस्ट):-अन्न व औषध प्रशासन (म.राज्य) चंद्रपूर कार्यालयाने कोविड-19 प्रार्दुभाव काळात लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत धडक कारवाई केलेली आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2020 पर्यंत एकूण 189 आस्थापनांची सखोल तपासणी करुन प्रतिबंधीत अन्नपदार्थ जसे खर्रा, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी व पानमसाला अशा एकूण 36 प्रकरणांत 1262.409 किलो ग्रॅम रुपये 24 लाख 20 हजार 607 किमतीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. विक्रेत्यांविरुध्द संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. याविषयीचा पुढील तपास सुरु आहे.अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन (म.राज्य) चंद्रपूर नितीन मोहिते यांनी दिली आहे.
आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी इतर अन्नपदार्थ एकूण 10 प्रकरणांत 212.4 किलो ग्रॅम किंमत रुपये 30 हजार 999 साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला असुन 23 नमुने घेण्यांत आलेले आहेत. खजूर या अन्न पदार्थाचा नमुना कमी दर्जाचा आला असुन पुढील तपास सुरु आहे.
अन्न व औषध प्रशासन (म.राज्य) चंद्रपूर कार्यालयाने कोविड-19 प्रार्दुभाव काळात लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत धडक कारवाई केलेली आहे. प्रतिबंधीत अन्न पदार्थांव्यतिरिक्त इतर अन्न पदार्थाबाबत देखील कारवाई घेत आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी मे.रामेश्वर प्रोव्हीजन, ब्रम्हपुरी यांच्याकडे रिफाईड सोयाबीन तेलाचा साठा 178.4 किलो किंमत रुपये 17 हजार 127 अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करीत असल्यामुळे जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांकडून खर्रा, गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, तत्सम प्रतिबंधीत अन्नपदार्थ उत्पादन, साठा, वितरण, विक्री, वाहतुक करीत असल्याचे आढळुन आल्यास त्यांचेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.