वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबाच्या नविन इमारतीचे उद्घाटन

29

✒️भद्रावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भद्रावती(दि.6ऑगस्ट):- मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी लोगजीवनाशी समन्वय ठेवण्याचे द्रुष्टीकोणातुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगत असलेल्या वडाळा संरक्षित वनांचे जागेत वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन वडाळा ग्रा.पं.सरपंच निरंजना उरकांडे यांचे हस्ते सोशल डिस्टंगसींनचे सर्व नियम पाळुन उद्घाटन करण्यात आले.

       या उद्घाटनाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रविण, उपसंचालक ना.सी.लडखत, सहाय्यक वनसंरक्षक एम.सी.खोरे, कुलकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.के.शेंडे, श्री चव्हाण, श्री मुन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभात वडाळा,आष्टा, घोसरी, खुटवंडा, सोनेगाव, कोकेवाडा, अर्जुनी येथील सरपंच, पोलिस पाटील व ग्राम स्तरिय ईडीसीचे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते. या समारंभाचे निमित्ताने क्षेत्र संचालक एन.आर.प्रविण यांनी मार्गदर्शन केले. तर समारंभाचे प्रास्थाविक वनपरिक्षेत्र अधिकारी एस.के.शेंडे यांनी केले.