सोन्याच्या दागिन्यांवर मिळणार जास्तीचे कर्ज – आता स्टार्ट अप मिळणार सहज कर्ज

9

🔷 रिजर्व बँक ऑफ़ इंडिया ने घेतले अनेक मोठे निर्णय

🔷 आर बी आई चे गव्हर्नर शशिकांत दास यांनी केल्या मोठ्या घोषणा

🔷 छोट्या शेतकऱ्यांना मिळणार प्राधान्याने कर्ज

✒️नवी दिल्ली/न्यूज ब्यूरो चीफ(अतुल उनवणे,जालना)

मो-:9881292081

नवी दिल्ली(दि.6ऑगस्ट):-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टार्ट अप्ससाठी ,छोटे शेतकरी , सोने तारण कर्ज घेणाऱ्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. स्टार्ट अप्सला कोणत्याही प्रकारच्या फंडिगची समस्यावजाणवू नये यासाठी आरबीआयने स्टार्ट अपला आता प्रॉयरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये (कर्जासाठी प्राथमिकता) समावेश करण्याचानिर्णय घेतला आहे. सोबतच रिन्यूएबल एनर्जी सेक्टरला कर्जाचा मर्यादा देखील वाढवली आहे.प्रॉयरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत आरबीआयने स्मॉल अँड मार्जिनल फॉर्मर्स आणि वीकर सेक्शनला देण्यात येणारे कर्ज वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता यांना बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होईल.आरबीआयने आपल्या गाईडलाईनमध्ये बदल केले आहे. या संदर्भात त्यांनी स्टेकहोल्डर्सचे देखील मत जाणून घेतले.

नवीन गाईडलाईनमध्ये फ्रेंडली लेंडिंग पॉलिसीवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. याचा उद्देश शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करणे आहे. याअंतर्गत आता स्टार्टअप्स या कार्यक्षेत्रात आणले आहे. सोबतच रिन्यूएबल एनर्जी, ज्यात सोलर पॉवर आणि कंप्रेस्ट बायो गॅस प्लांटचा देखील समावेश आहे, त्याच्या कर्जाची मर्यादा वाढवली आहे. छोट्या शेतकऱ्यांना देखील कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत.
आरबीआयने (Reserve Bank of India) सामान्य नागरिकांना दिलासा देत सोन्याच्या दागिन्यांवरही कर्जाचे मूल्य (Gold Loan to Value LTV) वाढवले आहे.आता90टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकेल. आतापर्यंत दागिन्यांच्या मुल्याच्या 75 टक्के कर्ज मिळत असे. तुम्ही ज्या बँक किंवा नॉनबँकिंग फायनान्सिंग कंपनीमध्ये गोल्ड लोनसाठी अर्ज कराल,त्याठिकाणी आधी तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता तपासण्यात येते. सोन्याच्या गुणवत्तेच्या हिशोबाने तुम्हाला
मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरवली जाते. बँकांकडून सोन्याच्या दागिन्यांच्या एकूण मुल्याच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जात असे.आता हे मूल्य 90 टक्के केले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत घोषणा केली.तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या या संकटकाळात आरबीआयकडून करण्यात आलेली ही घोषणा फायदेशीर ठरेल. कारण सामान्य नागरिक किंवा छोटे व्यापारी सोन्याच्या दागिन्यांवर अधिक कर्ज घेऊ शकतील. 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेणाऱ्यांनी सोन्याची सुध्दता तपासून कर्ज देण्यात येते, दरम्यान 18 ते 24 क्यारेट सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांना कर्ज स्वरूपातून चांगली रक्कम घेता येणार आहे.

काय आहे गोल्ड लोन?

गोल्ड लोन असे एक सुरक्षित कर्ज आहे, जे तुम्हाला उधार देणाऱ्या बँक किंवा एनबीएफसी मध्ये तुमच्याकडे असणारे सोने गहाण ठेवून मिळते. त्यानंतर या बँका किंवा एनबीएफसीकडून तुम्हाला सोन्याच्या बाजार मुल्याप्रमाणे रक्कम दिली जाते. तुम्हाला निश्चित कालावधीमध्ये ही रक्कम फेडावी लागते. तुम्ही हे कर्ज फेडल्यानंतर तुमचे सोने तुम्हाला परत देण्यात येते.गोल्ड लोन मिळवण्यासाठी एका पासपोर्ट फोटोसहित, तुमचे ओळखपत्र (पासपोर्ट, ड्राइव्हिंग लायसन्स, आधार कार्ड) आणि पत्त्याचा पुरावा (वीजबिल किंवा फोन बिल) द्यावे लागेल. पॅन कार्ड देखील द्यावे लागेल, PAN नसल्यास फॉर्म 60 जमा करावा लागेल. कोणतीही 18 वर्ष पूर्ण असणारी किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारी व्यक्ती गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकते.

कोणत्या प्रकारचे सोने गहाण ठेवू शकता?

तुम्ही कर्ज मिळवण्याकरता सोन्याचे दागिने गहाण ठेवू शकता.या दागिन्यांच्या शुद्धतेवरून तुम्हाला मिळणारी रक्कम निश्चित करण्यात येते. त्याचप्रमाणे वेगळे प्रोसेसिंग शुल्क देखील आकारण्यात येते. दरम्यान बँकांकडून सोन्याची बिस्किटे, नाणी किंवा सोन्याच्या विटा स्विकारल्या जात नाहीत.

सोने किती सुरक्षित राहते?

परवाना नसणाऱ्या बँका किंवा एनबीएफसीमध्ये तुमचे सोने हरवण्याची शक्यता असल्याने हे जोखमीचे काम आहे. त्यामुळे असा सल्ला देण्यात येतो की, विश्वसनीय उधार देणाऱ्या संस्थांकडून कर्ज घेण्यात यावे. कारण ते वोल्टमध्ये सुरक्षित राहते.अशा ठिकाणी सुरक्षेची गॅरंटी मिळते.