श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी – नवीन २४ रुग्ण संक्रमित

64

🔺मढेवडगाव मध्ये 4 कोरो ना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.7ऑगस्ट):-श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील वृद्धाचा कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. तालुक्यात कोरोना बळींची संख्या ४ झाली आहे. तर गुरुवारी नवीन २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात तीन दिवसांचा कडकडीत लॉक डाऊन पाळूनही रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे.
येळपणे येथील ८० वर्षांचा वृद्धाला त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची कोरोना चाचणी सकाळी ११ वाजता पॉझिटीव्ह आली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तालुका आरोग्य विभागाने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू ओढवला. त्यामुळे तालुक्यातील मृतांच्या आकडा चारवर पोहोचला आहे.
गुरुवारी १६३ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या. श्रीगोंदा शहरात ६ रुग्ण सापडले. कुंभारगल्ली-२, शाहूनगर-१, चांभारगल्ली-१, झेंडाचौक-१ तर होळीगल्लीत १ जण पॉझिटिव्ह आला. ग्रामीण भागात हंगेवाडी – ८, मढेवडगाव- ४, बेलवंडी-१, पारगाव-१, देवदैठण-२, अजनूज-१, येळपणे-१ रुग्ण संक्रमित सापडले. आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या ३३२ वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्त २२४ झाले आहेत. गुरुवारी १९ जण बरे होऊन घरी परतले. तर बळींची संख्या ४ झाली आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी विभागाने दिली आहे.
मढेवडगाव मध्ये मागील एक दोन दिवसापूर्वी मढेवडगाव मध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते त्यामुळे दोन दिवसांसाठी मढेवडगाव गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
मात्र तरीसुद्धा रॅपिड अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये मढेवडगाव 4 कोरोना पॉझिटिव रुग्णांची भर पडली आहे.
मढेवडगाव येथे गर्दीच्या वस्तीत एकूण ६ रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
त्याचबरोबर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे