राजे विर संभाजी मंडळा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

33

🔹 जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण,युवकाची मोठी उपस्थिती

✒️चांदूर रेल्वे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चांदुर रेल्वे(दि.7ऑगस्ट):-चांदूर रेल्वे येथील इंदिरा नगरातील राजे विर संभाजी उद्यानात युवकांनी नगरातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्याचा निर्धार करून वृक्षारोपण केले.पर्यावरातील समतोल राखण्यासाठी आज वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन मंडळाचे अध्यक्ष सप्निल मानकर यांनी पुढाकार घेतला व परिसरातील पितृतुल्य नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण केले.

मागील दहा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात राजे विर संभाजी मंडळा गणपती उत्सव,रक्तदान,विविध क्षेत्रातील नामवंत कलाकार,खेडाळू तसेच 10 व 12 परिक्षेत गुणवत्ता प्राप्त मुला मुलीचा सत्कार,समाज प्रबोधनाचे कार्यक्रम मंडळाच्या तर्फे दरवर्षी घेण्यात येते तर या वर्षी कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इंदिरा नगरातील राजे विर संभाजी उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 4 आॅगस्ट रोजी सकाळी परिसरातील जेष्ठ नागरीच्या हस्ते राबविण्यात आले,विविध प्रकारचे वृक्ष मोठ्या संख्येत लावण्यात आली या उपक्रमात नगरातील सर्वच नागरिका सह तरुणांनी सहभाग घेतला होता.लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्धार तरुणांनी केला.सिमेंट रस्त्यामुळे निसर्गाची होत असलेली हानी व सतत चालू असलेली वृक्षतोड अश्यात हजारो वाहनांतील कार्बनडॉक्साइड वायूचा वाढता दुष्परिणाम तसेच वाढते तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे.म्हणून मंडळाने या वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करून वृक्षारोपण केले. यावेळी प्रमुख उपस्थिती नरेंद्र लांबे,ज्ञानेश्वर गावंडे,गिरीराज शिंदे,सुधाकर डाखोरे,भास्कर गावंडे,रामभाऊ निस्ताने, गजानन बडवाईक, सुधाकर कपाट, गुड्डू शर्मा, राजेश शिवणकर, स्वप्नील मानकर, प्रणव बोके, गोपाल अविनाशे, अर्पित देशमुख, अभिजित चव्हाण, अमित क्षिरसागर, सौरभ लांबे, मंदार कडू, ऋषी अडेकर, अथर्व पोलाड, रोशन भोजने, अभिनव घोंगडे, सोनू ऊरकडे, संकेत पुंड, निखिल बावणे, अक्षय श्रीरामे, गजानन डाखोरे, मयांक शिंदे, अंश दीक्षित, यथार्थ मोरे व परिसरातील नागरीक उपस्थित होते.