सातारा जिल्ह्यात मध्यम सरिंचा वर्षाव – पावसाने पिकांनाही जीवदान!

13

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.7ऑगस्ट):- सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील पाणीसाठा 50 टक्‍क्‍यांवर गेला आहे. हा पाऊस फुलोऱ्यात आलेल्या खरीप पिकांना फायदेशीर ठरला असून, जावळी, पाटण व महाबळेश्वर तालुक्‍यांत भात लागणीस सुरुवात झाली आहे.गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 37.70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे

.जून, जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दमदार सुरुवात केली. हवामान खात्याने आगामी दोन दिवसवादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाचा जोर कायम आहे.माण, खटाव व फलटण तालुक्‍यांत तुरळक पाऊस असून,उर्वरित तालुक्‍यांत संततधार पाऊस सुरू आहे. सातारा शहरासह तालुक्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.जगप्रसिद्ध असलेले कास पठार येथे फुले यायला सुरुवात झाली आहे उन्हामुळे सुकून गेलेली सर्व झाडे झुडपे, वनस्पती आकाशातून पडलेले अमृत पिऊन खुश आणि हिरवीगार झाली आहेत. 6912.26 मिलिमीटर, तर सरासरी 628.39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.