🔸अनुदान रोखल्याने घरकुलाचे स्वप्न केव्हा पुर्ण होणार

✒️ पोंभुर्णा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पोंभुर्णा(दि.7ऑगस्ट): – पोंभुर्णा शहर हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येऊ पहात आहे.या शहरात वाईट हाऊस सारख्या देखण्या इमारती उभ्या राहिल्या आहेत पन निधी नसल्याचे कारण पुढे करून शहरातील गोर गरीब जनतेचे घराचे स्वप्न मात्र अधुरे आहे यामुळे घरकुलाचा निधी त्वरीत देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा ने मुख्याधिकारी नगरपंचायत पोंभूर्णा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
पोंभुर्णा शहरात शहरात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आहे. तुटपुंज्या मजुरीत झोपड्या ,कच्चे घर बांधून आपल्या कुटुंबासह राहत आहेत.

अश्यातच राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त योजनेतून पंतप्रधान आवास योजना सर्विकडे लागू केले व ज्यांना घर नाही अश्या सर्वाना घर देण्याचा निर्णय घेतला लोकांनी फॉर मोठ्या उत्साहाने त्या निर्णयाचे स्वागत केले व नगरपंचायत पोंभुर्णा मध्ये मागील तीन वर्षां पूर्वी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अंदाजे शेकडो लाभार्थाने अर्ज केले.

त्यापैकी काही लाभार्थानी रीतसर नगरपंचायत कडून बांधकाम परवानगी घेऊन आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना शासनाकडून अनुदान मिळतीलच अश्या आशेने आपले राहते घर खोलून उसनवारी,खाजगी कर्ज घेऊन घरबांधकाम चालू केले.अश्यातच कोरोनाचे संकट आले सर्व देश लॉक डाऊन झाला घराचे बाहेर निघण्यास मनाई घर बांधकाम अधुरे राहिले उपासमारीची वेळ आली.मागील एक वर्षा पासून अनुदान मिळाले नाही.ज्या लाभार्थाचे बांधकाम स्लॅब लेव्हल पर्यंत आले.आता पावसाळा चालू आहे. पावसामुळे भिंतीही कोसळू शकते व एक नवीन संकट येऊ शकते.घर खोलून राहण्याकरीता तात्पुरते
घर भाड्याने घेतले.त्यांचे भाडे देणे,बांधकामास घेतलेले उसनवारी ,कर्जाची रक्कम वापस द्यायची कुठून अश्या द्विज भूमिकेत हा लाभार्थी सापडला असून आता ही सरकारी योजना नकोरे बाबा म्हणण्याची वेळ आली आहे.

       मोठ्या आशेने नवीन घराचे स्वप्न पाहले परन्तु ते अधुरेच राहिले तेव्हा नगरपंचायत पोंभुर्णा ने या लाभार्थ्यां ना त्वरित अनुदान देण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा , चंद्रहास उराडे तालुका अध्यक्ष,रवि तेलसे तालुका महासचिव,श्यामकुमार गेडाम जिल्हा सदस्य,राजु खोब्रागडे शहर अध्यक्ष,अतुल वाकडे तालुका अध्यक्ष युवा आघाडी,दादुभाऊ ढोले,अविनाश कुमार वाळके जिल्हा प्रमुख आयटि सेल,अमित निमसरकार,लोकेश झाडे,प्रणीत मानकर,मंगल लाकडे,रफिक शेख, , यांनी नीवेदनाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र, मागणी, लाइफस्टाइल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED