श्रीगोंदा तालुक्यात कोरोना मुळे झालेल्या मृत्यूची संख्या 6 वर

26

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

🔺म्हातार पिंपरी येथे पहिल्यांदाच एकदम आठ कोरोना बाधित रुग्ण सापडले

श्रीगोंदा(दि.7ऑगस्ट):- श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी उशिरा आलेल्या अहवालात दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने बळींची संख्या ६ झाली आहे. तर श्रीगोंदा शहरातील पहिल्या बळीची नोंद झाली आहे. तर दुसरा बळी पिंपळगाव पिसा येथील खरातवाडी येथील  ६० वर्षाच्या व्यक्तीचा उपचार चालू असताना नगर येथे मृत्यू झाला.दोन्हीही व्यक्ती जुने आजार व जास्त वय असल्याने मृत्युमुखी पडले. बळींची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
       रॅपिड चाचण्या चालू केल्यापासून शुक्रवार दि.७ रोजी  सर्वाधिक २०० चाचण्या घेण्यात आल्या. त्यात संपूर्ण तालुक्यात १९ रुग्ण संक्रमित सापडले.
             श्रीगोंदा शहरात दिलासा देणारी बातमी म्हणजे शुक्रवारी फक्त ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. लॉक डाऊनचा इफेक्ट जाणवला. शहरात शाहूनगर-२ व ससाणेनगर येथे १ रुग्ण सापडला. तर ग्रामीण भागात म्हातारपिंप्री येथे पहिल्यांदाच एकदम ८ रुग्ण सापडले. काष्टी-२, पेडगाव-१, लिंपणगाव-१, टाकळी लोणार-१, घारगाव-१, कोंडेगव्हाण-१ याप्रमाणे संक्रमित रुग्ण सापडले तर २२ जण कोरोना मुक्त झाले.आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या ३५१ झाली आहे.२४० मुक्त होऊन घरी परतले, ६ जण मृत्युमुखी पडले तर सद्यस्थितीला १०५ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
           मढेवडगाव व म्हातारपिंप्री या शेजारी गावांमधील काही व्यक्ती रांजणगाव-कारेगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यामध्ये कामाला जातात. त्यांना अपडाऊन साठी कंपनीने स्पेशल बसेसची व्यवस्था केली आहे. दोन्ही गावातील संक्रमित झालेले सर्वाधिक रुग्ण तेथील कामगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतून कोरोनाची या गावांना सप्रेम भेट मिळाली आहे. दोन्ही गावात मिळून १६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. या कामगारांमूळे या गावांची डोकेदुखी वाढली आहे.