✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.8ऑगस्ट):-अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती झोपेत असताना आधी त्याचे हातपाय पलंगाला बांधून मग त्याचे तोंड दाबून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी उघडकीस आली.
राजू हरिदास कुकुर्डे (वय ३७ रा. भीमनगर) असे या प्रकरणातील मृतकाचे नाव आहे. तर शुभांगी राजू कुकुर्डे (वय ३०) तिचा प्रियकर रुपेश दिलीप बीरहा (वय ३५, रा. उपजिल्हा रुग्णालय वसाहत कामठी) आणि रुपेशचा भाऊ हरिश्चंद्र राजेंद्र बीरहा (वय ३४ रा. बोरियापुरा कामठी) अशी आरोपींची नावे आहेत.

राजू कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात परिचारक पदावर कार्यरत होता. रुग्णालय परिसरातील सरकारी निवासगृहात तो पत्नी शुभांगी व पाच वर्षांच्या मुलीसह राहायचा. रुपेश या निवासगृहाच्या लगतच्या वस्तीत राहत असे. रुपेशही विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. शुभांगी व रुपेश यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती राजूला मिळाली. यावरून शुभांगी आणि राजू यांच्यात सातत्याने वाद होऊ लागले. रोजच्या वादानंतर या दोघांचे भेटणे सुरूच होते. गुरुवारी परत एकदा यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी शुभांगीने वाद मिटवण्याचा बनाव केला आणि झोपण्याचे नाटक केले. हे बघून राजूही झोपला.

शुभांगीने रात्री २ वाजता प्रियकर रुपेश व त्याचा चुलत भाऊ हरिश्चंद्र याला बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी राजूचे हातपाय पलंगाला बांधले व उशीने तोंड व नाक दाबून त्याचा खून केला. राजूचे हातपाय बांधत असताना त्या झटापट केली आणि तो जोरजोरात ओरडू लागला. हा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत राजूचा मृत्यू झाला होता. मात्र, तिन्ही घटनास्थळीच होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

क्राईम खबर , नागपूर, महाराष्ट्र, मेट्रो, राजनीति, राज्य, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक, हटके ख़बरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED