ओंकार आस्वले यांचा कुपोषण निर्मूलनाचा प्रयत्न प्रेरणादायी

  48

   

  *ओंकार आस्वले यांचा कुपोषण निर्मूलनाचा प्रयत्न प्रेरणादायी

  *जिवती येथे 5 मॅम बालकांना दिली बाळू भेट*

  जिवती :
  स्वर्गीय श्रीरामजी आस्वले यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांचा मुलगा श्री. ओंकार आस्वले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून समाजापुढे आदर्श निर्माण केला या प्रसंगी अमित महाजनवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी गारुले, सुपर वायजर बारापात्रे,अंगणवाडी सेविका,पत्रकार सुरेश साळवे,संघरक्षित तावाडे,ओंकार आस्वाले, बाळूचे सागर भटपल्लीवार उपस्थीत होते.
  बाळू उपक्रमातून दिलेला पोषण आहार बालकांना कसा दयावा व किती प्रमाणात या विषयी सुपर वायजर बारापत्रे यांनी पालकांना मार्गदर्शन केले बाल विकास प्रकल अधिकारी गारुले यांनी अतिदुर्गम जिवती तालुक्यातील कुपोषित बाळांना कुपोषणातून बाहेर काढण्याचा प्रयत्ना साठी केलेल्या मदती करीत बाळू चे आभार मानले तसेच सर्वोपतरी सहकार्याचे आश्वासन दिले.
  या प्रसंगी बाळू चे संस्थापक अमित महाजनवार यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सचिव व सरपंच यांनी जातीने लक्ष देऊन 10 टक्के महिला व बालकल्याण वर ग्रामपंचायती मार्फत करवायचा खर्च कुपोषित बालकांच्या मदतीकरिता व शालेय पूर्व शिक्षणा च्या उत्कृष्ठ दर्जा मिळविण्या करीता केल्यास निश्चितच उद्याचे सुदृढ व शिक्षित नागरिक आपल्याला निर्माण करता येईल तसेच अंगणवाडीत येणारी बालके ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे भावी विद्यार्थी असल्याने सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सुध्दा बाळू उपक्रमाअंतर्गत भरीव योगदान करावे असे आवाहन केले.