ब्रम्हपुरी येथील रान भाजी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद

    44

    ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी (दि.९ऑगस्ट):- आज रविवारला १०.३० ला ब्रम्हपुरी इथे कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजीपाला मार्केट ब्रम्हपुरी, रानभाजी महोत्सव पार पडला,या महोत्सवाचे आयोजक सुनील ताकते (तालुका कृषी अधिकारी ब्रम्हपुरी) यानी भर पाऊसात या महोत्सवाचे आयोजन खूप छान पध्दतीने केले. व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुध्दा खूप जिव्हाळ्याने सहयोग केले.

    रानभाजी महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सौ. रिताताई उराडे (नगराध्यक्षा नगरपरिषद ब्रम्हपुरी), कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रभाकरजी सेलोकर (अध्यक्ष तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समिती (आत्मा) ब्रम्हपुरी), व तसेच प्रमुख उपस्थित, मा.श्री. मोरेश्र्वरजी पत्रे (सभापती कृ. उ. बा. समिती ब्रम्हपुरी ), मा. सौ. सूनिताताई तिडके (उपसभापती कृ. उ. बा.समिती ब्रम्हपुरी), मा.श्री. रामलालजी दोणाडकर (सभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी), मा. सौ. सूनीताताई ठवकर (उपसभापती प. स. ब्रम्हपुरी), मा. क्रांती डोंबे (उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी), मा. श्री. दिगंबर तपासकर (उपविभागीय कृषी अधिकारी नागभिड), मा. श्री. विजय पवार (तहसीलदार ब्रम्हपुरी), मा.प्रणाली खोचरे (संवर्ग विकास अधिकारी ब्रम्हपुरी), मा. श्री. मंगेश वासेकर (मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी),मा. श्री. बाळासाहेब खाडे (पोलिस निरीक्षक ब्रम्हपुरी) या सर्वांच्या उपस्थितीत रानभाजी महोत्सव उद्घाटन सोहळा पार पडला.

    या महोत्सवाचे मुख्य केंद्र बिंदू म्हणजे शेतकरी आपल्या सोबत रानभाज्या घेऊन उपस्थित होते. या महोत्सवामध्ये कृषितज्ञानी विशेष रानभाज्यांचे , रान फळांचे मानवी आहारातील आरोग्य विषयक महत्त्व सांगितल आहे. या महोत्सवाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या रानभाज्यांना आर्थिक फायदा होईल असे पण सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे भर पाऊसात ब्रम्हपुरी तील रानभाजी महोत्सवाला प्रतीसात मिळाला आहे.