आल्लापल्ली येथे कर्नाटक राज्य सरकारच्या विरोधात केला शिवसेनेच्या वतीने निषेध

8

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी(दि.9ऑगस्ट):-अहेरी विधानसभा शिवसेना पक्षाच्या वतीने मा. शिवसेना जिल्हा प्रमुख गडचिरोली, राजगोपाल सुलवावार यांच्या नेतृत्वात, उप जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख, अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख, अरुण भाऊ धूर्वे सर , अहेरी विधान सभा संघटक बिरजू गेडाम, अहेरी विधानसभा युवा सेना जिल्हा प्रमुख , दिलीप सुरपाम , तालुका प्रमुख अहेरी, अक्षय करपे, ग्रामीण तालुका प्रमुख, इम्रान खान पठाण, सुभाष घुते, शिवसैनिक यांच्या प्रमुख मार्गद्शनाखाली कर्नाटक राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा हटविण्यात आले या बी जे पी सरकारने जाणून बुजून असे महा पाप केल्याने जिल्हा शिवसेनेच्या वतीने आलापल्ली येथे जाहीर निषेध कार्यक्रम घेण्यात आला.

  यावेळी जिल्हा प्रमुख यांनी कर्नाटक राज्य सरकारच्या विरोधात जल्लोष साजरा करीत म्हणाले जो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा त्याच ठिकाणी उभा करत नाही तो पर्यंत आमचा विरोध निषेध कार्यक्रम सतत चालू राहणार आणि गडचिरोली जिल्ह्यातून शिवसैनिक पदाधिकारी, भारत देशाची जनता कर्नाटक राज्यात कुच करणार याची केंद्र सरकार ने लक्षात घ्यावी आता शिवसैनिक आर पार भूमिका घेणार शिवाजी महाराज यांचा अपमान भारत देशाचा अपमान आहे, असे आव्हान जिल्हा प्रमुख यांनी केली, शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी महाराज, आवाज कुणाचा शिवसेनेचा, कर्नाटक राज्य सरकारच्या निषेध असो, येदुरप्पा जाहीर माफी मागावी, जोरदार विरोध करीत जल्लोष शिवसेनेचा वतीने करण्यात आले, यावेळी  उप जिल्हा प्रमुख, प्रभारी, धर्मराज रॉय भाऊ, अहेरी विधानसभा युवा सेना उप जिल्हा प्रमुख, नितेश येमुलवार नागेश रज नालावर, साज्जू शेख, महेंद्र सुलवावार , अंकुश मंडळावर, वैभव दोनाडकर, प्रफुल एरणे, महेश मोहूर्ले, हसन शेख, गणेश गुर्नुल्ले, असे अनेक शिवसैनिक, शाखा प्रमुख, शिवसेना पदाधिकारी, या निषेध कार्यक्रमात सहभागी झाले.