बांधकाम मजुरांना आर्थिक मदत देण्यात यावी

24

🔸बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया तर्फे सहायक कामगार आयुक्तांना निवेदन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.9ऑगस्ट):-महाराष्ट्र शासनाने लाकडाऊनच्या कालावधीत नोंदणीकृत बांधकाम मजुरांना आर्थिक मदत म्हणून रुपये 2000/- चीघोषणा केली होती परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील 163 नोंदणीकृत बांधकाम मजूरांना अजूनपर्यंत 2000/- रुपयांची आर्थिक मदत प्राप्त झालेली नाही सध्या लाकडाऊनमुळे या बांधकाम मजुरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे.

  या 163 गरजू व नोंदणीकृत बांधकाम मजुरांना शासनाची 2000/- रूपयांचीआर्थिक मदत त्वरीत देण्यात यावी या मागणीचे निवेदन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या नेतृत्वाखाली सहायक कामगार आयुक,चंद्रपूर यांना शुक्रवार दिनांक 7 आगस्ट 2020 रोजी देण्यात आले यावेळी संघटनेचे सल्लागार सुभाष मेश्राम, महाराष्ट्र राज्याचे सह सचिव मुन्ना उर्फ पुरुषोत्तम आवळे विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय शिडाम, चंद्रपूर जिल्हा सल्लागार नवनाथ देरकर, जिल्हा कार्यकारिणीचेसदस्य मंगल शेंडे, रवींद्र देशभ्रतार,सिद्धार्थ भस्मे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.