खटाव तालुक्याची जीवनवाहिनी येरळा नदी अद्यापही तहानलेलीच

28

🔸अपुऱ्या पावसामुळे भवीष्यात दुष्काळाची शक्यता

✒️नितीन राजे(खटाव/सातारा-विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.9ऑगस्ट):-कायम दुष्काळी असणारा खटाव तालुक्यात जून महिन्यापासून ढगाळ वातावरण व बारीक पावसाच्या जीवावर खरीप हंगाम येण्याइतपत पाऊस झाला. मात्र खटाव तालुक्यातील नऊ मंडलात पाऊस समाधानकारक झाला नसून तालुक्यात असणारे तलाव व धरण मोठा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.त्यामुळे जनतेला येणाऱ्या मे महिन्याची काळजी आतापासूनच लागल्याचे चित्र दिसत आहे.

खटाव तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसात तलाव व धरण यातील उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.येरळवाडी 17%, नेर 34%,दररोज 32 टक्के,शिरसवडी 11टक्के, सातेवाडी 5%, मायनी 10% तर येऊ पारगाव आंबेवाडी कानकात्रे वाडी येथील तलाव पूर्ण मोकळे आहे असे चित्र तालुक्यात दिसत आहे.

   खटाव तालुक्यातील येरळवाडी व नेर तलाव सर्वात मोठे असून यात अनुक्रमे 17 टक्के व 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने यातला वारंवार होणार रब्बी हंगाम अवलंबून असतो येत्या काही दिवसात जर मोठा पाऊस झाला नाही तर खटाव तालुका फुटाळा दुष्काळाला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट दिसत आहे.