एक्सेल इंडिया स्पोर्ट ब्लबच्या वतीने वर्धा येथे वृक्षारोपण

22

✒️सचिन महाजन(वर्धा प्रतिनिधी)मो:-9765486350

वर्धा(9 ऑगस्ट):-युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकारच्या नेहरु युवा केद्रांशी संलग्न असलेल्या एक्सेल इंडिया स्पोर्ट  क्लब च्या वतीने  गंदगी मुक्त भारत अभियान अंतर्गत आज स्वागत कालॅनी डाफे लेआऊट परीसरात मा. श्री अजय गौळकर, सरपंच ग्राम पचांयत पिपरी मेघे व सुधीर वसु ग्राम पंचायत सदस्य  हयांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हयामध्ये वनोषधी असलेले वृक्ष , अडुळसा, निलगिरी, फणस, आवळा,  कडुनिंब, बेल, निलगिरी, कांचण्, आमटा, आपटे, आंबा, उंबर, आदी झाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन एक्सेल इंडिया स्पोर्ट क्लबचे प्रितेश रामटेके व रुपेश चिडे सर  सौ प्रियंका रामटेके व मिनाक्षी रामटेके हयांनी केले होते.

वृक्ष लागवडी साठी प्रगती सोसायटीतील  चांभारे सर, नरेश पोकोजवार, छोटु रामटेके,  चंदु बुधबावरे, नाना शेळकी, प्रशांत गोलाईत, संजय बोगा, सुरेद्र रामटेके, प्रकाश रायपुरे, दयाराम रामटेके, अरुण खंडाईत, खयाम, नंदा रामटेके  लोहकरे सर आदीनी सहकार्य केले .तसेच क्रांती दिवस व बिरसा मुंडा जयंती निमीत्य श्री अजय गोळकर ह्यांनी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रम यशस्वतीसेसाठी प्रियंका ब्युटी पॉर्लर व एक्सेल इंडियाच्या पदाधिकारी हयांनी प्रयत्न केले.