श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील एकाच कुटुंबातील 7 कोरोना बाधित

  39

  🔺खरातवाडी वरील एकाचा मृत्यू

  ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

  श्रीगोंदा(दि.10ऑगस्ट):- तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील तुकाई मळा येथे रविवारी एकाच कुटुंबातील सात व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांची धाक धुक वाढली आहे
  खरातवाडी येथे पंधरा दिवसापूर्वी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता त्यानंतर कोणत्याही प्रकारची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्काची पार्श्वभूमी नसलेले खरातवाडी व पिंपळगाव पिसा येथील वाड्या वस्त्यावर अठरा व रुग्ण कोरोना पॉझिटिव सापडले दोन दिवसापूर्वीच खरातवाडी येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला
  खरातवाडी व पिंपळगाव पिसा येथील बरेच रुग्ण कोणावर मात करून बरे झाले त्यापैकी केवळ दोन रुग्ण उपचार घेत होते खरातवाडी व पिंपळगाव पिसा कोरणा मुक्तीकडे वाटचाल करत असताना तुकाई मळा येथे एकाच कुटुंबातील सातजण कोरोना पॉझिटिव आले दोन दिवसांपूर्वी या कुटुंबातील एका व्यक्तीला उपचारासाठी नगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्या व्यक्तीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव आला होता त्यानंतर एकाच कुटुंबातील सात जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
  कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिसरातील लोकांना सावधानता बाळगावी लागणार आहे. लोकांनी कामाशिवाय जास्त बाहेर फिरता स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. त्याशिवाय कोरोना ची साखळी तुटणे अशक्य आहे नागरिकांनी वीणा माक्स घराबाहेर पडू नये शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी केले आहे.