छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचे भुषण-प्रा.अतुल दुबे

7

🔺कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध

✒️आतुल बडे(परळी,प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.10ऑगस्ट):–कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मानगुत्ती या गावामधे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केला आहे.असे कृत्य करणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला.

     हिंदवी स्वराज्य संस्थापक पराक्ररमी आणि सर्वांना न्यायप्रिय वाटणारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचे भुषण असुन कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मानगुत्ती या गावामधे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केला आहे.असे निंदनीय कृत्य करणाऱ्या कर्नाटक सरकारचा भारतीय विद्यार्थी सेनेचे बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे.