कोरोनाच्या सावटाखाली तळेगाव येथे बापुसाहेब देशमुख गोरठेकरांचा वाढदिवस साजरा

    36

    ✒️नायगाव(प्रतिनिधि)चांदू आंबटवार

     मो:-9307896949

    नायगाव(दि.10ऑगस्ट):- धर्माबाद व ऊमरी या तीन तालुक्यांचे खंबीर नेतृत्व करणारे व जनसामान्यांचे कैवारी अशी ख्याती असणारे मा.आ. बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचा वाढदिवस दि. 9 आॅगस्ट 2020 रविवार रोजी मौजे तळेगाव येथे साजरा करण्यात आला.

    जगावर कोरोना चे सावट असल्याने हा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने व सोशल डिस्टंसींग चे पालन करण्यात आले होते. गोरठेकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमीत्त 2000 मास्क व सॅनीटायझर वाटप व जिल्हा परिषद गट तळेगाव मधील मंडळा येथील प्रा. आरोग्य केन्द्राचे भुमिपुजन देखील या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले.या भुमीपुजनाला गिरीष भाऊ देशमुख गोरठेकर ( सभापती पं. स. ऊमरी) , सौ. अनिता यल्लमगोंडे ( जि.प. सदस्या), सौ. संगिता बालाजी जाधव( जि.प. सदस्य), गणेश पाटील गाढे ( तालुका अध्यक्ष भाजपा ऊमरी), सदाशिव पवार, सदानंद खांडरे.व ग्रामस्थ हजर होते.