जिद्दीचा आणि चिकाटी आत्मविश्वास स्वतःशी प्रामाणिक निस्वार्थपणे कार्य करीत असलेला असाच एक अपंग मधला एक वेडा

25

✒️ माधव बालाजी शिंदे ता.नायगाव,जि.नांदेड
मो:-७७५७०७३२६०

अंध अपंगांच्या व्यथा निराळ्याच. कुणी पाहतं मदतीच्या नजरेनं तर कुणी सहानुभूतीने तर कुणी कुत्सिकतेनं. त्यात सख्खे सोयरे असतात, काही कामाचा नाही म्हणणारेही असतात. परंतु, अशा बोलघेवड्यांना आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर चपराक हाणणारेही काही अपंग आहेत. हिंगोली जिल्ह्यातील बोंडाळा या गावचा रामदास भानुदास लढे असाच एक जबरदस्त चपराकी वल्ली.

रामदास च्या वडिलांना दारुचं व्यसन.. आई मोलमजूरी करायची. दोघंही अडाणी. शिक्षण नसल्यानं सहीचाच नव्हे तर स्वतःचं नाव लिहिण्याचाही अधिकार गमावून बसलेले. इतरांच्या शेतीतले झोपडीचे आधार होते तेही ही अर्ध पडलेलं.. ना जमीन ना जुमला, तरी मुलाचा शिकून मोठा अधिकारी व्हावा आपल्या प्रमाणेच इतरांच्याही मदतीला धावून जावा हे त्यांचं स्वप्न.. लहान मुलगा रामदास दोनी डोळ्याने अंध आहे आई बापाला रामदास अंध असल्याने त्यांच्या जीवाला आपल्या मुलाची चिंता आणि घेरलं होतं परंतु तरीसुद्धा आई-बाबा डगमगले नाही इतरांच्या सल्ल्याने का होईना पण रामदासला अंध शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यास पाठवले रामदास चे प्राथमिक शिक्षण मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध मुला-मुलींचे विद्यालय हिंगोली येथे सातवीपर्यंत पूर्ण झाले त्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न आईबाबांना समोर उभा राहिला सातवीनंतर हिंगोली जिल्ह्यांमध्ये एकही अंध शाळा नसल्याने पुढील शिक्षण कसे करायचे शिकण्याची तर इच्छा मनाशी होतीच रामदास ची त्यानंतर तेथीलच शिक्षकांनी मार्गदर्शन करून रामदासला पुण्याला पाठवा असे सांगितले मग आई-वडिलांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता रामदासला थेट पुण्यामध्ये पुढील शिक्षण घेण्यास पाठवले त्याच्या शिक्षणासाठी पुण्यातल्या अनेक शाळा बघितल्याकाही शाळा फक्त मुलींसाठी मर्यादित होत्या तर मुलांसाठी फक्त एक ते दोन शाळा होत्या त्याही दोन शाळा आम्ही मोठ्या विद्यार्थ्यांना घेत नाही असे सांगून दुसऱ्या शाळेमध्ये प्रयत्न करा असे म्हणायचे पण तरीसुद्धा आई-बाबा डगमगले नाही आईबाबांनी नवीनच सुरू झालेल्या पुण्यामध्ये प्रेम भाऊ प्रज्ञाचक्षू विद्यालय या शाळेमध्ये रामदास ला प्रवेश घेण्यास पाठविले मग कसेबसे रामदास चे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले परंतु दहावीच्या वर्षांमध्येच बाबां वरती काळाने घात केला बाबाला दारूचे व्यसन असल्याने बाबा सतत दारू पीत बसायचे एक दिवस असाच होता बाबा आजारी असताना देखील बाबांनी आजार पणा मध्येच दारू पिली आणि नकळतच बाबांची लिव्हर खराब झाली आणि बाबाचा लिव्हर चे ऑपरेशन करता करतात बाबांचा मृत्यू झाला.

मग त्यावर ती अनेक जण बोलत होते की बोलत चालत हसत-खेळत सगळ्यांना सांगून गेल्यासारखेच रामदास चे बाबा गेले रामदास ला देखील त्यांनी सांगितलं होतं की आता ही शेवटची भेट असेल माझी आणि त्यावेळेस रामदासांनी देखील त्यांना खूप सतावले होते खूप त्रास दिला होता दहावीचे वर्ष असल्याने आणि गोष्टींची मागणी केली होती पुस्तके डॉक्युमेंट ठेवण्यासाठी फाईल व काही पैसे फी भरण्यासाठी इतर अनेक गोष्टींनी रामदास नि देखील त्यांना त्रासून सोडले होते मग कधीकधी आताही रामदासला प्रश्न पडतो की आपल्या त्रासामुळे बाबांनी स्वतःला त्रास करुन घेतला की काय असे सतत वाटत असते ई-मेल दहावीच्या वर्षाच रामदास चे वडील मृत्युमुखी झाले त्यानंतर रामदास चे आयुष्य अगदीच कठीण झाले कारण एकीकडे राहायला घर नाही शेती नाही जमीन नाही काय करणार कसे होणार आहे तरी किती दिवस मजुरी करणार असे असंख्य प्रश्न हे डोळ्यासमोर उभे होते त्यात आईने देखील वडील गेल्यानंतर खूप मोठे टेन्शन घेतले जवळ कोणी नसल्याने एकटीच असायची रामदास पुण्यामध्ये शिक्षण घेत असायचा बहिणीचे लग्न झालेले असायचे लहान भाऊ अगदी छोटासा जवळ असायचा मोठा भाऊ इतरांच्या कामाला असायचा मग एकटीच पडली आणि अनेक प्रश्न अनेक टेंशन अनेक संकटं की आई समोर उभी राहायची आईला काय करावे काय नाही सुचलं असे झाले सतत वडिलांची आठवण यायची माझ्या मिस्टरांना कोणी मारले असावे कोणी काय केले.

असावे असे अन असंख्य प्रश्न डोळ्यासमोर उभे असायचे आणि त्याच्या त्रासाने आई सुद्धा खूप त्रास होऊन गेली आणि आपल्या मेंदू वरती परिणाम करून घेतला त्यावेळेस समजायला देखील कोणीही नसायचे सत्याने एकटीच बडबडायचे एकटीच विचारविनिमय करायची आणि त्याचा परिणाम थेट डोक्यावरती झाला त्यावेळेस पण अनेक मावशी काका नातेवाईकांनी सहकार्य केले.

काही कालांतराने साठी इलाज बरा झाला परंतु गोळ्या औषध योग्य उपचार योग्य वेळी मिळत नसल्याने जास्तीत जास्त प्रयत्न करूनही जो काही त्रास व्हायचा परिणाम व्हायचा तो अधिकच वाढत गेला आणि शेवटी मनोरुग्ण झाले आणि वेड्यासारखा पणा करत राहिले मग असे करता करता रामदास ने आपले शिक्षण अकरावी-बारावी हे पुढे चालू ठेवले पुण्यामध्ये परंतु बारावीच्या में वर्षाला आईचे देखील नकळत मेंटली प्रॉब्लेम मुळे निधन झाले अक्षरशा रामदासला आई चा शेवटचा मुखडा पाहता सुद्धा आला नाही आईची भेट देखील घेता आली नाही कारण रामदास ची बारावीची परीक्षा चालू होती त्यामुळे विशेष घरच्यांनी देखील त्याला काही कळले नाही ज्यावेळेस रामदासला कळले त्यावेळेस सगळी ही वेळ निघून गेलेली होती अगदी दहा पंधरा दिवस झाले होते त्यानंतर रामदास ला फोनवरून त्याक्षणी अश्रू अनावर झाले ढसाढसा रडून रामदासला धीर द्यायला देखील कोणी नव्हते त्याला काही मित्र खावाला सोडवायला देखील गेले आणि मग रामदास आपल्या राहत्या घरी पोहोचला स्वतःच्या तर घर नव्हते मावशी मामा यांच्याकडे जाऊन राहिला ती वेळ अगदी दिपवाळी ची वेळ होती साल 2015 होते मग रामदास अगदीच त्रासून गेला खूप टेन्शन मध्ये आला काय करावे काही नाही काही कळेनासे झाले लहान भावाने तर शिक्षण केव्हाच सोडून दिले मग रामदास चा खूप मोठा प्रश्न होता काय करावे काही नाही पुढील शिक्षण करावे की न करावे त्याला तर शिकण्याची इच्छा राहिली नव्हती परंतु अनेक नातेवाईकांनी व्यक्तींनी धीर दिला आणि त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले पण काळाने रामदास चे दोन्ही छत्र हे दोन्ही में वर्षातच हरवले मग रामदास ला आपणही जीवन सोडून द्यावे असे कधी कधी वाटायचे अक्षरशः त्यालाही आपल्या जीवनाचा कंटाळा यायचा परंतु अनेक लोकांनी धीर दिला अनेक नातेवाईक यांनी सहकार्य केले आणि रामदास ची पुढील जीवन देखील एक अगदी आनंददायी बनले त्याला एक जीवनाची नवी वाटचाल मिळाली आई-वडिलांना शेवटपर्यंत त्याला साथ द्यायची होती त्याचे शिक्षण पूर्ण करून त्याला मोठे करायचे होते त्याला कुठल्यातरी पदावर ती पाठवायचे होते आणि त्याला इतरांची सेवा करताना पाहायचे होते परंतु काळाने त्यांच्यावर ती आघात केला आणि त्यांना रामदास चे हे संपूर्ण जीवन पाहू दिले नाही पण तरीसुद्धा रामदास या सर्व गोष्टी सावरून आपल्या जीवनाची डगमगला नाही जिद्दीने आणि जोमाने आणि आत्मविश्वासाने पुढे लढत राहिला संघर्ष जीवनाशी करत राहिला ते जरी आयुष्यभर आपल्याला पुरले नाही परंतु आपण त्यांचे नाव मोठे करायचे आणि त्यांच्याप्रमाणेच इतरांना आधार देण्याचे काम करायचे कारण वडिलांना रामदास मी बघितले होते इतर लोकांना मदत करताना सहकार्य करताना इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होतांना त्यामुळेच रामदास नाही पण आज तीच प्रेरणा घेतली की काय असेच सर्वांना वाटू लागते आहे कारण रामदास चे वडील आपल्या कुटुंबाचा स्वतः विचार पहिले न करता इतरांचा विचार करायचे इतरांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे आपल्याकडे पाच रुपये जरी असले तरी ते इतरांना निम्मे का होईना पण देण्याचे प्रयत्न करायचे हीच सवय आता रामदास ने घेतली का काय असेच सर्वांना वाटू लागले आहे म्हणून आज रामदास इतरांच्या जीवनाचा आधार बनून पाहतो आहे.