✒️आदेश उबाळे(विशेष प्रतिनिधी)मो:-9823503547

पुणे(दि.11ऑगस्ट):-केंद्रीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल दत्तात्रय मोरे तसेच दैनिक जनसेवा तालुका प्रतिनिधी तसेच टायगर टाईम्स संपादक यांच्यावर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केलेला आहे. 9 ऑगस्ट रोजी सव्वा सहाच्या दरम्यान वडगाव का शिंदे ता अंबेगाव येथील घोड नदीच्या तीरावर पद्मावती देवी मंदिरा जवळ तेथे वाळू तस्कर गेल्या अनेक महिन्यांपासून वाळूतस्कर अवैद्य रित्या वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाली असता तेथे प्रफुल्ल मोरे व त्यांचे मित्र पत्रकार दैनिक जनप्रवास चे संतोष सावंत हे दोघे स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी चौदा ते पंधरा वाळू तस्कर उपस्थित होते या दोघानीं शुटिंग काढण्यास सुरुवात केली असता वाळूमाफियांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व मोबाईल देखील काढून घेतला आहे.

   त्यांना पाठीवरती वगैरे वार केले आहेत तसेच दगडांनी वगैरे मारहाण तसेच त्यांच्या मोबाईल फोन वरील फोटो दाखवत होते की आम्ही या पत्रकारांचे मर्डर करतो आणि मर्डर करण्याच्या उद्देशाने त्यांचा जबरी मारहाण त्यांच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून पळत सुटले व ते एका युवकाच्या गाडीला हात करून पोलीस स्टेशनला आले व तेथून त्यांच्यावर सध्या मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे दोघांवर उपचार चालू आहे या घटनेचा केंद्रीय पत्रकार संघटनेतर्फे दौंड तालुका तर्फे दौंड पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे या निवेदना द्वारे वाळूमाफीयांवर पत्रकार सरक्षंन कायद्याद्वारे गुन्हे दाखल करण्यात यावे व आरोपींना तत्काळ अटक व कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन दौंड पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले या वेळी दौंड तालुका अध्यक्ष श्री सदाशिव रणदिवे, दौंड तालुका सचिव श्री विठ्ठल होले दौंड,तालुका प्रसिद्धीप्रमुख विलास कांबळे,दौंड तालुका संघटक श्री शिवकुमार कांबळे, दौंड शहर संपर्क प्रमुख श्री अमित जगताप, दौंड तालुका सदस्य  श्री सनी पानसरे तसेच गणेश गायकवाड हे सर्व उपस्थित होते.

Breaking News, पुणे, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED