करवीरच्या ५१ ग्रामपंचायतीवर प्रशासकीय नियुक्ती

31

🔸वाडीपीर प्रशासक पदी संदेश भोईटे

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.11ऑगस्ट):-करवीर तालुक्यातील दि . ७ ऑगस्ट २०२० रोजी मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी वाडीपीर, बालिंगे व निगवे दुमाला या तीन ग्रामपंचायतीची जबाबदारी विस्तार अधिकारी एस.ए.भोईटे यांच्याकडे सोपवण्यात आली.
नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, वित्तीय आणीबाणी, प्रशासकीय अडचणी, महामारी किंवा युद्ध यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशी तरतूद आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासन स्तरावरील अधिकार प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संबंधित जिल्ह्याचे प्रमुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शासन निर्णयान्वये प्रधान करण्यात आले आहे. सदर अधिकाराचा वापर करून कोल्हापूर जिल्ह्यातील आज आखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालण्याच्या दृष्टीने करवीर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचे गावनिहाय प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये कुर्डू:विश्वास सुतार , भुयेवाडी : एस.पी.कांबळे, बालिंगा : एस.एस.भोईटे, खुपिरे : भारती कोळी , खाटांगळे : धनाजी पाटील , निगवे दुमाला : एस.एस.भोईटे , वाडीपीर : एस.एस.भोईटे , देवाळे : उमेश कोळी , आडूर : गजानन तवटे , कोपार्डे : बी.एस.जगताप कुडित्रे : एस.एस.भोईटे , कळंबा तर्फे कळे : वाय.के.जाधव , उपवडे : विजय पाटील , रजपूतवाडी : रियाज खान , म्हालसवडे : एस.पी.कांबळे , आरे : ए.ए.जाधव , पाटेकरवाडी : भारती कोळी , शिये : सुनीलकुमार गायकवाड , चाफोडी : एल.एन.मोहिते , नागदेववाडी : एस.बी.हेळवार हळदी : एल.एन.मोहिते , पाडळी खुर्द : ए.ए.जाधव , येवती : विजय पाटील , भामटे : वाय.के.जाधव , केर्ली : रमेश पाटील , आमशी : व्ही.बी.नलवडे , गर्जन : गजानन तवटे , सडोली खालसा : विजय पाटील , गाडेगोंडवाडी : ए.ए.जाधव , साबळेवाडी : पी.जी.राठोड, कोथळी : सुनील गायकवाड , बेले : एम.व्ही.तिवले , शिंदेवाडी : पी.जी. राठोड , कोगे : बी.एस.जगताप , बाचणी : एस.पी.कांबळे , महे : पी.जी.राठोड , कुरुकली : व्ही.बी.नलवडे , पडवळवाडी : भारती कोळी , म्हारुळ : धनाजी पाटील , हणमंतवाडी : विश्वास सुतार तामगाव : पी.जी.राठोड , सांगवडे : पी.जी.राठोड , हालसवडे : पी.जी.राठोड , गिरगाव : उमेश कोळी , कोगील खुर्द : एम.व्ही . तिवले , नंदगाव : किशोर आयरे , वडकशिवाले : सुनील गायकवाड , कोगील बु .: एम.व्ही.तिवले , इस्पूर्ली : सुनील गायकवाड , मुडशिंगी : एस.एस.भोईटे, खेबवडे : एस.बी.हेळवार अशा पद्धतीने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्यात आली आहे.