चिमुरात आज (दि.11ऑगस्ट) रोजी एक व्यक्ती आढळला कोरोना पोसिटीव्ह

14

▪️ पोलीस वसाहतीतील निवास थानात आला होता बीड जिल्ह्यातुन प्रवास करून

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.11ऑगस्ट):-येथील पोलीस कर्मचारी निवस्थानामध्ये 6 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातुन माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी  येथून प्रवास करून आलेला 25 वर्षीय व्यक्ती आज (दि.11ऑगस्ट) रोजी कोरोना पोसिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

     सदर व्यक्ती चिमुरात आल्या पासून संस्थात्मक विलगिकरणात होता,10 ऑगस्ट रोजी त्याची चाचणी घेण्यात आली आज त्याचा अहवाल पोसिटीव्ह आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झाली. सदर पोसिटीव्ह असलेल्या व्यक्तीची पत्नी ही पोलीस विभागात सेवारत असून पत्नी व मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.