मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यासाठी शिवसंग्रामचे माजलगाव तहसीलदार यांना निवेदन

32

✒️माजलगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

माजलगाव(दि.11ऑगस्ट):-मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आघाडी सरकार दुर्लक्ष करत असून सरकारने वेळ न घालवता आपली बाजू भक्कमपणे मांडून मराठा समजाच्या गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजलगाव तहसीलदार यांच्याकडे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे कली आहे.
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लाखोंचे मोर्चे समाज बांधवांनी अत्यंत शांतपणे मुक मोर्चे काढून आपली व्यथा मांडली. परंतु हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडले असले तरी सरकारने ठोस पुरावे देवून कायद्याच्या बंधनातून आरक्षण सोडवून ते गोरगरीब मराठा समाजाला मिळवून दिलं पाहिजे पण ठाकरे सरकारला याचे काहीच देणे घेणे नसल्याचे दिसू लागले आहे. उपसमितीची स्थापना झाली त्यात अशोक चव्हाण यांना प्रमुख केले. मात्र तेही समाजासाठी काही करतांना दिसत नाही त्यामुळे त्यांना उपसमितीच्या पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकराव मेते साहेबांनी केली असून अश्या अनेक मागण्यांसाठी प्राथमिक स्वरूपाचे राज्यात हजारो निवेदन देवून मागणी केली आहे. सरकारने समाजाची भूमिका भक्कमपणे मांडून समाजाला न्याय मिळवून द्यावा अश्या आशयाचे निवेदन माजलगावच्या तहसीलदार प्रतिभा गोरे मॅडम यांना दिले आहे यावेळी शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष उत्तम बप्पा पवार , युवक उपाध्यक्ष रामेश्वर गवळी, युवा नेते इंजि. अक्षय शिंदे, गणेश ननावरे, दत्ता झुटे, हुस्मान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.