“बँक ऑफ इंडिया ग्राहकाच्या दारी”

  50

  ?हुस्सा येथील ७० कर्ज अर्जावर केल्या सह्या.

  ✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधि)
  मो:-9307896949

  नायगाव(दि.12 ऑगस्ट):-नायगाव ,उमरी,धर्माबाद विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश पवार व नायगाव पंचायत समिती माजी सभापती सौ.सुलोचना प्रल्हाद हंबर्डे आणि बाबासाहेब हंबर्डे या सर्वांच्या प्रयत्नामुळे “बँक ग्राहकाच्या दारी” या उपक्रमातुन सत्तर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फाईलीवर सह्या करण्यात आल्या.
  नायगाव  तालुक्यातील हुस्सा येथे  ” बँक ग्राहकाच्या दारी ” या उपक्रमाअंतर्गत बँक ऑफ इंडिया चे शाखाधिकारी लक्ष्मणराव गडदे व त्यांचे सहकारी यांनी  हुस्सा या गावात येऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून दिवसभर जवळपास पीक कर्जाच्या सत्तर फाइल्स वर सह्या करून कर्जाचे अर्ज मंजूर करून उर्वरित शेतकऱ्याचे कर्ज फाईलीचे काम सुरु असून. हुस्सा येथे बँक ऑफ इंडिया ग्राहकाच्या दारी येऊन शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण निकाली काढून उर्वरीत महिला व पुरुषांच्या कर्ज फाईलीवर लवकरच सह्या करून पीक कर्ज वाटप करण्यात येईल असे आश्वासन शाखाधिकारी गडदे यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हुस्सा येथील  शेतकऱ्यांनी  बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी गडदे व नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांचे आभार मानले आहे.
    विकास कामे करण्याचा प्रयत्न बाबासाहेब हंबर्डे यांनी उपसरपंच पद भूषवित असताना हुस्सा गावाचा विकास करण्यासाठी हंबर्डे यांनी कांही दिवसापूर्वी गावातील विविध विकास कामासाठी ६७ लाखाचा निधी खेचून आनून  आमदार राजेश पवार व राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. गावाच्या विकासाठी आतापर्यन्त मी कुठेही कमी पडलेला नसून आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियाची शाखा ग्राहकाच्या दारी आणून तळागाळातील शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.