🔸सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करा व अन्य मागण्यांचे मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत दिले निवेदन

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.12ऑगस्ट):-दि 25 मार्च पासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळे बंदी करीत सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडीने राज्यभर डफली बजाव आंदोलन केले असून वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात डफली बजाव आंदोलन करीत मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचे मागणी निवेदन दिले.

कोरोना रोखण्यासाठी राज्य शासनाने टाळेबंदी करीत सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केली परंतु जवळपास पाच महिने होऊन ही सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू केली नाही त्यामुळे वंचित घटकाला त्रास सहन करावा लागत आहे
राज्यातील बससेवा ,बेस्ट सेवा सुरू करण्यात याव्या तसेच जिल्हा बंदी उठवावी शंभर टक्के लोकसंख्येवर निर्बध घातल्याने दुष्परिणाम समोर येत आहे अर्थ व्यवस्था संकटात असल्याने ऐंशी टक्के लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे याची दखल वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर यांनी घेतली असून राज्यभर डफली बजाव आंदोलन उभारून शासनाचे लक्ष केंद्रित केले आहे.

वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे व चिमुर अध्यक्ष विनोद सोरदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी श्रीदास राऊत ,प्रवीण गजभिये, वासुदेव गायकवाड, लालाजी मेश्राम ,अश्विन मेश्राम, मोरेश्वर रामटेके ,रामदास राऊत, भागवत बोरकर ,शैलेश गायकवाड ,ज्ञानेश्वर नागदेवते ,आशिष बोरकर ,शालीक थुल ,शुभम मंडपे,भाग्यवान नदेश्वर, अड एस जी श्रीरामे,मनोज राऊत विनोद देठे आदी उपस्थित होते ….

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED