अखेर पाच महीन्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात येथे झाला कोरोनाचा शिरकाव

38

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.12ऑगस्ट):-तालुक्यातील विसापूर हे परिसरातील नागरिकांची सतत वर्दळ असणारे गाव असताना गेल्या पाच महीन्यात कोरोना मुक्त होते.मात्र मंगळवारी येथील रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अखेर रेल्वे मार्गे विसापूर येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
विसापूर रेल्वे स्थानकात काम करणारे हे कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी येथील शिवाजीनगर भागात भाड्याने खोली घेऊन रहातात.दोन दिवसांपूर्वी त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी नगर येथे जिल्हा रुग्णालयात सोमवारी कोरोना टेस्ट करुन घेतली.त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे त्यांना विसापूर येथे त्यांच्या घरातच कॉरंटाईन करण्यात आले आहे.त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नसल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय शिंदे व आरोग्य परिचारिका गायकवाड हे उपचार करत आहेत.

विसापूर रेल्वे स्थानकात कार्यरत असलेले एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याने त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन करण्यात आले असून ते एकटेच या ठिकाणी रहात आहेत.त्यांना जर कोरोनाचे लक्षणे जाणवू लागले तर त्यांना रेल्वेच्या सोलापूर येथील कोवीड सेंटर मध्ये पाठवण्यात येईल. मात्र सध्या ते ठणठणीत आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करून घेण्यात येत आली आहे.सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
*स्रोत- बी.पी.थोरात,स्टेशन प्रबंधक,विसापूर रेल्वे स्थानक.*