

▪️ माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व महाराष्ट राज्य विज ग्राहक संघटना शेगांव यांची मागणी
✒️शेगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)
शेगाव(दि.12ऑगस्ट):-कोरोना मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकट ध्यानी घेऊन दरमहा 300 युनिटच्या आत वीज ग्राहकांची गेल्या तीन महिन्याची संपूर्ण वीज देयके माफ करण्याबाबत वरील मागणीसाठी सोमवार दिनांक 13 जुलै रोजी वरील मागणीसाठी राज्यातील जिल्हा व गाव पातळीवर राज्यभर आंदोलन झाले वीज बिलांची होळी करण्यात आली व राज्य सरकारकडे मागण्याचे निवेदन देण्यात आले.
राज्यातील 22 जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने झाली तथापि राज्य सरकारचा प्रतीसाद अत्यंत निराशाजनक आहे 20 ते 30 टक्के सवलतीची सरकारची घोषणा जनतेची क्रूर चेष्टा करणारी व त्यांच्या दुःखावर मीठ सोडणारी आहे ही सवलत आम्हाला मान्य नाही तीन महिन्याचे संपूर्ण वीज बिले माफ करण्यात आली पाहिजे या मागणीसाठी आज पुन्हा निवेदन देत आहोत
देशात आणी राज्यात सध्या लाॅकडाउन लागु करण्यात आलेला आहे त्याला आता 140 दिवसाच्यावर कालावधी लोटला असुन राज्य सरकारने 31 आॅगस्ट पर्यत त्यात वाढ केली आहे या काळात अनेकाची रोजीरोटीच बंद असल्याने उदारनिर्वाह करतांनागरिब,कष्टकरी,मध्यमवर्गीय या सर्वाचीच दमछाक झाली आहे त्यामुळे महावितरण कडुन तिन महिन्याचे विजदेयक येताच जनतेत अंसतोष निर्माण झाला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने दरमहा 300 युनिट पर्यत विज वापर असणारे राज्यातील सर्व घरगुती विज ग्राहकाची मागील 3 महिन्याची विज देयके माफ करावीत .करोना विषाणुच्या साथीने देशात पाय पसरायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच मा. पंतप्रधान नरेन्द् मोदी यांनी 25 मार्च पासुन देशात लाॅकडाउन ची घोषणा केली .गरिबाचा गाठीशी असलेला थोडा फार पैसाही संपत आला आहे त्यामुळे अनेकाच्या मनात उपासमारीची व रोजगाराची भिती डोकावत आहे त्यात महावितरणकडुन आलेले भरमसाठ विज बिल कुठुन भरावे हा एक प्रश्न आहे.
या पाश्वभुमीवर दरमहा 300 युनिट पर्यत विज वापर असणारे राज्यातील सर्व घरगुती विज ग्राहकाची विज देयके माफ करण्यात यावी व यासाठी आवश्यक त्या रक्कमेची भरपाई राज्य सरकारने महावितरण व संबधीत कंपनीस अनुदान स्वरुपात देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट राज्य विज ग्राहक संघटना व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्याकडुन मा. तहसीलदार साहेब शेगांव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे मा. मुख्यमंञी महाराष्ट राज्य यांच्याकडे करण्यात आली सदर निवेदन देतांना श्री. भिकाजी वरोकार ,अंबादास पवारमहाराष्ट विज ग्राहक संघटना शेगांव तालुका अध्यक्ष , पंकजअशोक शाहु, रितेश टेकडीवाल, श्रीराम खोंड, बाळकृष्णा भोजने, कुंदन इंगळे अहमद अली हुसैन अली राहुल समाधान खंडेराव , उपस्थीत होते.