प्रशासनाच्या उदासीनते मुळे दिव्यांग हा ‘दिव्यांग मित्र अँप्स’ पासून वंचित.

36

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधि)मो:-9307896949

नायगाव(दि.13ऑगस्ट):- तालुक्याचे गट विकास अधिकारी बहुतांश ग्राम सेवक व ग्राम पंचायत आँपरेटर नी दिव्यांगांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील हजारो दिव्यांग बांधव नोंदणी पासून वंचित आहेत. नांदेड जिल्ह्यचे पालक मंत्री मा. अशोकराव चव्हाण साहेबांनी दिव्यांगांच्या शासकीय योजनेची प्रभाविपणे अमलबजावणी व्हावी या उद्देश्याने ” दिव्यांग मित्र ” या अँप्सची निर्मिती केली व या अँप्स चे प्रशिक्षण नांदेड जिल्ह्यातील सर्व मा. गटविकास अधिकारी यांना देऊन व सर्व ग्रामसेवक आणि ग्राम पंचायत आँपरेटर यांना पत्र देऊन व समाज कल्याण विभागाचे पत्र क्र. 1495 दि. 16/07/2020 रोजीचे पत्र देऊन या अँप्स ची प्रभावी पणे अमलबजावणी झाली नाही.व दिव्यांग संघटनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला सुद्धा विश्वासात घेतलेले नाही.
नायगाव तालुक्यात एकुण 80 ग्राम पंचायती अंतर्गत 2248 दिव्यांग असुन आत्तापर्यंत तालुक्यात केवळ 691 दिव्यांगांची नोंद झाली त्यात नायगाव शहरातील 130 व ग्रामीण मध्ये 561 दिव्यांगांची नोंद झाली.