✒️नवी मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नवी मुंबई(दि.13ऑगस्ट):-सप्टेंबर महिन्याच्या 12 तारखेपर्यंत पर्यंत सिडको प्रशासनाने प्राचीन बौद्ध लेणी मातीच्या ढिगाऱ्या खालून नाही काढली तर आम्ही स्वतः वाघिवलीवाडा बौद्ध लेणीचे उत्खनन करून सिडको आयुक्त कार्यालयाला ताळेबंद करू असा गंभीर इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी लेणी पाहणी दौरा अंतर्गत प्रशासनाला दिला.
राज्यासह भारतात बौद्ध संस्कृती नष्ट करण्याचे षडयंत्र होऊ घातले असून बौद्ध दलित मुस्लिम आदिवासी वर अन्याय अत्याचार वाढले आहेत, या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनात आले की हे सरकार अकार्यक्षम आहे, या सर्व बाबी सरकारच्या ध्यानी आणण्यासाठी येत्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेराव घालणार असल्याचेही यावेळी सांगितले.
सदर प्राचीन वास्तू ही बौद्ध धर्मियांची अस्मिता असली तरी राष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा होय, राष्ट्राची संपत्ती व बौद्ध इतिहास असाच संपवू देणार नसून आंतरराष्ट्रीय परिचित पुज्य भदंत शिलबोधी व पुज्य भिक्षु संघाच्या मार्गदर्शनाखाली लेणीचे संवर्धन करणार असल्याची ग्वाही सुद्धा कनिष्क कांबळे यांनी दिली.
यावेळी पुज्य भदंत संघप्रिय यांनी बुद्ध पूजा पाठ वंदना घेऊन आपले मत व्यक्त केले, OBC समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी सिडकोच्या कपट नितीबद्दल माहिती देऊन सध्या देशात बुद्धतत्वज्ञानाची गरज असून धम्माचा प्रचार व प्रसार होणे काळजी गरज असल्याचे सांगितले,
युथ पँथर चे भाऊ कांबळे, बंजारा संघटनेचे राज्य प्रमुख भाई शिवा राठोड, धम्मसेवक सुनील अडसुले, भन्तेजींचे अंगरक्षक अनिल धाटे, वसंत वटाणे व यांनी मनोगत व्यक्त केले व पँथर ऑफ सम्यक योद्धांच्या आंदोलनाचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
RPI राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माक्निकर, राज्य महासचिव श्रावण गायकवाड, वंचित चे नवी मुंबई प्रभारी अध्यक्ष वीरेंद्र लगाडे, प्रसिद्ध विधिज्ञ Adv. प्रभाकर रनशूर, संतोष चौरे, किरण चौरे, दलित पँथर चे योगेश भालशंकर, सम्यक पँथर व RPI चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष, लेणी, गड किल्ले व संविधान रक्षक पुज्य भदंत शिलबोधी यांनी लेणी संदर्भात प्रास्ताविक मांडून उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली. संततधार पावसात असंख्य कार्यकर्ते या RPI (D) च्या लेणी पाहणी दौऱ्यात उपस्तीत होते हे विशेष.

आध्यात्मिक, धार्मिक , महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED