साथ फाउंडेशन अनाथ मुलीचा पुनर्जन्म करण्याचा प्रयत्न

18

✒️सचिन महाजन(हिंगणघाट,तालुका प्रतिनिधी)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.13ऑगस्ट):- येथील एक कुटुंब ज्या मध्ये मुलगी वय 16, मुलगा वय 18, आजी, आजोबा वय 75 हे दाम्पत्य छोट्याशा झोपडी मध्ये कठीण आयुष्याचे दिवसे मोजते आहेत. आजी-आजोबांची मुलगी मरण पावल्यानंतर नातू आणि नातीन चा सांभाळ त्यांच्या खांद्यावर येऊन ठेपला. जावयाचा 12 वर्षांपासून पत्ता नाही.
मग काय नातु नातवाला जगवायचे आहे. त्यासाठी आजी लोकांचे भांडे घासायला जाते तर आजोबा 3 शेळ्या राखतात.नातीन या वर्षी 10 वी मध्ये होती आणि तिने या कठीण परिस्थितीत 62% घेतले. तिला पुढे शिक्षण घ्यायची पूर्ण इच्छा आहे. तर नातु मंदबुद्धी म्हटले तरी चालेल अशी परिस्थिती.
हिंगणघाट येथील जिल्हा परिषद चे शिक्षक बावणे सर यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती साथ फाउंडेशन च्या सदस्यांच्या कानांवर पडली. कोणताही विलंब न करता त्या म्हाताऱ्या दाम्पत्याचे घर गाठले आणि रीतसर संपूर्ण माहिती गोळा केली.सर्व व्यवस्था झाल्यावर साथ फाउंडेशन च्या माध्यमातून त्या मुलीचे शिक्षण, राहण्याची व्यवस्था करून तिच्या जीवनाचा पुनर्जन्म कसा करता येईल यावर फाउंडेशन चा अभ्यास चालू आहे.