राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे महिला जिल्हा अध्यक्ष पदी प्रेमिला रामटेके यांची निवड

    48

    ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गडचिरोली(दि.13ऑगस्ट):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय विभाग चे जिल्हा अध्यक्ष डॉ देविदास मडावी यांनी प्रमिला रामटेके यांची सामाजिक न्याय विभागाचे महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यांचे श्रेय मा.आमदार धर्मराव बाबा आत्राम माजी राज्य मंत्री, मा.रवि भाऊ वासेकर जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, युनूस शेख प्रदेश संघटक, डॉ. सुलोचना मडावी यांना दिले.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे महिला जिल्हा अध्यक्ष पदी प्रेमिला रामटेके यांच्या निवडीबद्दल ज्ञानेश्वर पायघन, ईद्रपाल गेडाम ,योगेश नांदगाये, सुनिल कुमरे, गजानन मुनघाटे, नानाजी सुरपाम सुनिता सेलोकर, वच्छला बारसिंगे, अर्चना उमरे, वणिता सुरपाम आदि सर्वांनी अभिनंदन केले.