जागतिक मुलनिवासी दिनानिमित्य संकटग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांला केली मदत

16

✒️नितेश केराम(कोरपना,तालुका प्रतिनिधी)मो:-8698423828

कोरपना(दि.13ऑगस्ट)मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा या विचारला अनुसरून जागतिक आदिवासी दिनाच्या औचीत्यावर राजुरा तालुक्यातील गुडा या गावात शुक्ला व कोडापे दाम्पत्यांनी एका गरीब आदिवासी शेतकऱ्यांला आर्थिक मदत केली. जागतिक मूलनिवासी दिनामिनित्य भाषणबाजीला बगल देत कृतीशील उपक्रम राबवून महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे चित्र दिसत आहे.

राजुरा तालुक्यातील गुडा या गावातील काही दिवसापूर्वी एका गरीब आदिवासी मडावी नावाच्या शेतकऱ्याचे गोठे जाळून खाक झाले होते. त्या आगीमध्ये दोन गाई, एक बेल याचा होरपळून अंत झाला होता. यात शेतीचे विविध अवजारे, रासायनिक खत, व पूर्ण गोठा जळून खाक झाला. कोरोना या महामारीत सर्वत्र आर्थिक संकट उभे ठाकले असताना गोठ्याला आग लागून त्या शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले होते.

शिक्षक शुक्ला, जेशीआय राजुरा रायलच्या अध्यक्ष सुषमा शुक्ला, बाबा देवराव कोडापे, विजया बाबाराव कोडापे यांनी मडावी शेतकऱ्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. त्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी धीर दिला. तसेच मदतीचा हात म्हणून अन ध्यान व मदत केली.