राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

13

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.13ऑगस्ट):- यंदाच्या स्वातंत्र्य दिन वर्धापन सोहळ्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दि. 15 ऑगस्ट रोजी होणार आहे.
मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट रोजी होत आहे. हा सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी होईल. त्यामुळे इतर संस्था व कार्यालयांनी सकाळी 8.35 ते 9. 35 या कालावधीत कोणताही समारंभ ठेवू नये. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर दि.14 ऑगस्ट रोजी दुपारी गडचिरोली येथे येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण:-

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निमंत्रितांना ध्वजारोहण कार्यक्रम स्थळी प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांना ध्वजारोहण कार्यक्रम पाहता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाइन स्वरूपात ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रक्षेपण आयोजित केले आहे. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या यु ट्यूब(Dio Gadchiroli), फेसबुक व ट्विटर या अकाऊंटवरून नागरिकांना सदर कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण सकाळी 8.30 वाजले पासून ते कार्यक्रम संपेपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध असेल अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.