✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14ऑगस्ट):- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर मार्फत 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 18 ऑगस्ट 2020 रोजी एक दिवस कालावधीचे डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा (वेबिनार) आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत ऑनलाईन बिजनेस संधी, आयडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी, गुगल अॅडव्हर्ड,गुगल अॅनालिटिक्स, सोशल मीडिया मार्केटिंग, युट्युब, घरी बसून पैसे कमविण्याची संधी, उद्योग उभारणी प्रक्रिया इत्यादी विषयांवर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि.17 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे (मो. क्र.9309574045), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED