🔹15 ऑगस्ट निमित्त विशेष लेख

✒️ना. विजय वडेट्टीवार

– मंत्री – इतर मागास बहुजन कल्याण विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभाग

गेल्या काही दिवसांपासून आपणा सर्वांना कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक अडचणी ना तोंड द्यावे लागत आहे. वंचित, बहुजन समाज, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, बाराबलुतेदार, ओबीसी विविध लहान मोठ्या समाज घटकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विभागामार्फत सतत प्रयत्न सुरू आहे. बहुजनांचे कल्याण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सदैव तत्पर असून बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वानुसार काम करत आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची वाढीव मुदत दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) च्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही का सूट देऊ नये हा प्रश्न उपस्थित करून सर्व विद्यार्थ्यांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.

धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठीच्या गृहनिर्माण योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना. मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी ज्यांच्या राज्यकारभाराचे नाव नोंदले आहे. अशा दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला दिले आहे.

कोविड विषाणूच्या संसर्गामुळे उदभवलेल्या परिस्थितीत राज्यातील विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे विद्यार्थ्याना आवश्यक असलेले सर्व दाखले, प्रमाणपत्र, व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे असे आदेश राज्यशासनाकडून मॅट्रीकोत्तर शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आले आहे.

बार्टी व सारथी च्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती या संस्थेची निर्मिती, नागपूर येथे मुख्यालय. त्यासाठी विशेष निधी ची तरतूद करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या मुलांना मुलींना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यात येत आहे .

राज्यात ओबीसी मुला- मुलींसाठी स्वतंत्र 72 वसतिगृह सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी (मुलांचे एक व मुलींचे एक) दोन वसतिगृह बांधण्यात येणार आहेत.

ओबीसी समाजासाठी क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले घरकुल योजना सुरू केली.

आध्यात्मिक, चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED