अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारांना सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण

27

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14ऑगस्ट):-अधिष्ठाता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ.आर.एन.कूपर रुग्णालय विलेपार्ले, मुंबई यांच्या पत्रान्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू होणाऱ्या सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या इयत्ता 12वी विज्ञान महिला उमेदवारांकरिता 3 वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.

प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणादरम्यान मोफत निवास व भोजन व्यवस्था आहे. प्रशिक्षण काळात विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर जिल्हा चंद्रपूर अखत्यारीत येत असणारे नागभीड,चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी व भद्रावती तालुक्यातील इच्छूक पात्र उमेदवारांनी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal/mcgm.gov.in या संकेत स्थळावर दिनांक 20 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.