
🔺एक जवान शहीद दुसरा जखमी
✒️संतोष संगीडवार(आलापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275
आलापल्ली(दि.14ऑगस्ट):-गडचिरोली जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयअंतर्गत येत असलेल्या कोटी पोलिस मदत केंद्रातील पोलिस जवानावर नक्षल्यनि हल्ला केला असुन या हल्ल्यात पोलिस जवान शहीद झाला आहे तर दुसरा जवान जखमी असल्याची महीती प्राप्त झली आहे. दुशांत नंदेश्वर असे शहीद जवानाचे नाव असुन दिनेश भोसले या नावाचा जवान जखमी झाल्याची महीती आहे.माहितीनुसार दोन्ही जवान कोटी गावात किराणा सामान आणण्यासाठी गेले असता दरम्यान नक्षल्यनि त्या दोन्ही जवानावर हल्ला केला या हल्ल्यात दुशांत नंदेडश्वर हे शहीद झाले आहे अधिक महीती लवकरच प्राप्त होइल.