ब्रम्हपुरीचे तालुका कृषी अधिकारी सुनिल ताकते यांना दिला निरोप

22

🔸खंडाळे यांनी स्वीकारला तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यभार

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी, तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.१४ ऑगस्ट):- ब्रम्हपुरी तील नुकताच रानभाजी महोत्सव झाला असून या कार्यक्रमाचे आयोजक श्री. सुनील ताकते साहेब (तालुका कृषी अधिकारी ब्रम्हपुरी) नुकतीच त. कराड, जिल्हा. सातारा इथे बदली झाली आहे. यांचा (१३ ऑगस्ट)ला निरोप समारंभ झाला.श्री. सुनील ताकते (ता. कृ. अधिकारी ब्रम्हपुरी) यांनी आपल्या एक वर्षाच्या कार्यामध्ये खूप चांगलं काम केलं असून, ब्रम्हपुरी ला कृषी च्या कामात समोर नेण्याचं परिपूर्ण प्रयत्न केला आहे.
निरोपाच्या वेळेस श्री.सुनील ताकते साहेब यांनी आपले मनोगत थोडक्यात मांडले,त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या गावाकडे बदली झाली असून ते आनंदी आहेत अस म्हटल आहे. तसेच श्री.सुनील ताकते साहेब यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा,ब्रम्हपुरी तील शेतकरी बांधवांचा सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हटल आहे. व सर्वांच्या समोरच्या कार्याला शुभेच्या दिल्या आहेत.
ब्रम्हपुरी तील तालुका कृषी अधिकारी म्हणून श्री. खंडाळे साहेब यांनी पदभार स्वीकारला आहे.
निरोप समारंभाच्या वेळेस उपविभागीय कृषी अधिकारी नागभिड श्री दिगंबर तपासकर साहेब, मंडळ कृषी अधिकारी पी डी खंडाळे व निलेश मांद्रे, तालुक्यातील सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, सर्व कार्यालयीन कर्मचारी, कृषी मित्र व शेतकरी बंधू उपस्थित होते.