कुंटूर येथे 74 वा स्वतंत्र्य दिन साजरा

28

✒️चांदू आंबटवाड (नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.15ऑगस्ट):-जिल्हा परिषद हायस्कुल कुंटूर च्या प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. बी. राजपुत सर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना च्या महामारी मुळे दरवर्षी चा स्वातंत्र्य दिन व यावर्षीचा स्वातंत्र्य दिन यात फरक जानवत होता. विध्यार्थ्याविना झेंडावंदन म्हणजे फुलांविना गार्डन असेच चित्र दिसत होते चिमुकल्यांच्या चेहर्यावरील हसु व आनंद याची कमी जानवत होती. तसेच या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कुंटूर प्राथमिक आरोग्य केन्द्राचे डॉ. सोनवणे साहेब यांना मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.व हाच मुहूर्त साधून मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.व संपुर्ण कार्यक्रमात फिजीकल डिस्टंसिंग चे पालन होताना दिसत होते. या कार्यक्रमाला कुंटूर नगरीचे सरपंच श्री रुपेश भैया देशमुख, श्री शिवाजी पा. होळकर उप. सरपंच कुंटूर, लक्ष्मण पा. अडकिणे तंटामुक्ती अध्यक्ष, सुर्यकांत पा.कदम मा.पं. स. सदस्य, बाबुरावजी अडकिणे, पंडित पा. अडकिणे, रज्जाक शेठ गुजीवाले, श्री. परोडवाड साहेब तलाठी सज्जा कुंटूर, श्री. शेख वहाब साहेब मंडळ अधिकारी कुंटूर सर्कल, गणेश अप्पा स्वामी, नामदेव महाराज गिरी व ग्रामस्थ हजर होते.

—————————————————————–