स्वातंत्र्य दिनाच्या शुभ प्रसंगी पालकमंत्री मा. ना.विजय भाऊ वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते देवदुत (देविदास सातपुते) यांचा सन्मान

  39

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर(दि.15ऑगस्ट):- 74 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील ध्वजारोहण प्रसंगी गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा या गावचे उपसरपंच देविदास भाऊ सातपुते यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे हस्ते जिल्हा खासदार ,राजुरा विधासभा क्षेत्राचे आमदार, जिल्हा विभागाचे व पोलीस विभागाचे मुख्य अधिकारी, यांच्या उपस्थितीत प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
  संपूर्ण जगावर थैमान घातले ल्या कोरॉना प्रादुर्भावामुळे देशात संचारबंदी केल्या गेली.अश्या परस्थितीत परप्रांतात हजारो नागरिक अडकलेले होते.दरम्यान तेलंगाना ला महाराष्ट्रातील पोडसा हे सीमा लागलेली असल्यामुळे तेलंगाना तून स्वगावी येणाऱ्या हजारो मजुरांना पोडसा सीमेवर येऊन भर उन्हात थांबावे लागले.
  अश्या परिस्थितीत देवदूत म्हणून सत्कार्या साठी जीवाची पर्वा न करता पुढे निघालेला देविदास भाऊ सातपुते यांनी त्या मजुरांची प्रत्येक अडचण पाणी, अन्न, निवारा,अशा अनेक अडचणी दूर करून त्यांना आसरा दिला .व जेव्हापर्यंत संपूर्ण हजारो मजूर स्वगाव पोहचत नाही तेव्हा पर्यंत त्यांची सर्व गोष्टीने निघा राखली..
  या सत्कार्यासाठी त्या उपक्रमशील,वैविध्यपूर्ण, माणुसकीची खरी जाणं असलेल्या या महान सत्काऱ्यिक मानवाला देवदूत म्हणून संबोधल्या गेले होते.
  त्या प्रासंगिक आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभ प्रसंगी या कार्याचे मोल म्हणून देविदास सातपुते यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
  सन्मान प्रसंगी जिल्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजय भाऊ वडेट्टीवार, जिल्हाचे खासदार श्री,मा.बाळू भाऊ धानोरकर.राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.सुभाष भाऊ धोटे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री,महेश्वर रेड्डी जिल्हा अधिकारी श्री,अजय गुल्हाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी,जी.प.अध्यक्ष मैडम संध्याताई गुरनुले महा.नगर पालिका आयुक्त तसेच जिल्हा महापौर अशा महत्त्व पूर्ण प्रशासनाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला .