चिमूर नगर परिषदचे मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार

28

🔹कोरोना कोविड माहिती देण्यास करतो टाळाटाळ

🔸विनोद शर्मा यांचा आरोप

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.15ऑगस्ट):-कोरोना कोविड महामारी मागील मार्च महिन्यापासून सुरू असून जनतेच्या सुरक्षेसाठी शासन प्रतिबंधक साहित्य खरेदीसाठी निधी देत असताना चिमूर नगर परिषद मुख्याधिकारी खवले यांनी मनमानी कारभार करून अवाजवी किमतीत साहित्य खरेदी केले असल्याची चर्चा होत असताना माहिती अधिकाराचा वापर करीत माहिती मागितली परंतू अपूर्ण व असमाधानकारक माहिती दिली असता त्यांनी अपील अर्ज करून माहिती मागितले असता दि १४ आगस्ट ला सुनावणी होती परंतू मुख्याधिकारी खवले यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत माहिती देत नसल्याची दमदाटी केल्याने ते माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विनोद शर्मा यांनी केला आहे .

चिमूर नगर परिषद क्षेत्रात कोरोना वर प्रतिबंधित करण्यासाठी साहित्याची खरेदी करण्यात आली सॅनिटाईजर ,ताप मोजक मशीन ,मास्क आदी वस्तू खरेदी करण्यात आल्या अनावश्यक ठिकाणी हातधुनी केंद्र करून त्यात सुद्धा निकृष्ट वस्तू वापरल्या . मुख्याधिकारी खवले यांनी कोरोना संदर्भात ज्या वस्तू खरेदी केलेल्या त्या वस्तूची माहिती अधिकारात माहिती मागितली होती परंतु माहिती अपूर्ण व असमाधानकारक मिळाली असल्याने अपील घेत अपिलीय अधिकारी सीओ यांचे कडे अपील केली असता सुनावणी तारीख १४ आगस्ट दिली होती आज नप कार्यालयात सुनावणी संदर्भात गेलो असता आम्ही माहिती देऊ शकत नाही यापुढे काहीही मिळणार नाही अशी दमदाटी देत असभय वागणूक देत त्यांनी पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याने कोरोना वस्तू खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याने यापुढे वरिष्ठ अधिकारी कडे दाद मागणार असून मनमानी करणाऱ्या मुख्याधिकारी खवले यांचेवर कारवाई करण्याची मागणी विनोद शर्मा यांनी केली.